Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय! नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; ५५ दिवसांत निकाल
Pune

पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय! नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; ५५ दिवसांत निकाल

Nasarapur Murder Case
Nasrapur Case Final Verdict: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. केवळ ५५ दिवसांत लागलेल्या या निकालामुळे संपूर्ण प्रकरणात निर्णायक टप्पा गाठला गेला असून परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नसरापूर हत्याकांड आणि अत्याचार प्रकरणात (Nasrapur Case Final Verdict) आज भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सुनावणीदरम्यान शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि तपासातील पुराव्यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने अंतिम निर्णय जाहीर केला असून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे परिसरात आणि राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

या प्रकरणाचा निकाल अवघ्या ५५ दिवसांत लागल्याने तो जलद न्यायप्रक्रियेतील एक महत्त्वाचा निकाल मानला जात आहे. (Nasrapur Case Final Verdict)

मागील सुनावणीत काय घडलं?

२५ जून रोजी अंतिम युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी आरोपीला समाजासाठी धोकादायक ठरवत त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्याचा दावा करत त्याच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर बचाव पक्षाने आरोपीचे वय आणि परिस्थितीचा विचार करून जन्मठेपेची शिक्षा योग्य ठरेल असा युक्तिवाद केला होता.

१६ दिवसात १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्यात ५० हुन अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून, वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि डीएनए अहवालांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रकरणात तब्बल ५५ दिवसांत निकाल लागले असून नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Nasrapur Case Final Verdict)

नेमकं प्रकरण काय आहे?

नसरापूर (भोर तालुका, पुणे जिल्हा) येथे १ मे २०२६ रोजी साडेतीन वर्षांची एक चिमुकली अचानक बेपत्ता झाली. काही वेळातच तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक पुराव्यांच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले. पुढील तपासात डीएनए अहवाल, वैद्यकीय तपासणी आणि घटनास्थळावरील पुरावे महत्त्वाचे ठरले. (Nasrapur Case Final Verdict)

या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध अपहरण, अत्याचार आणि खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. नंतर प्रकरण विशेष न्यायालयात गेले आणि जलदगतीने सुनावणी पूर्ण झाली.

सरकारी पक्षाने साक्षीदारांचे जबाब आणि वैज्ञानिक पुरावे सादर करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली, तर बचाव पक्षाने वेगळी बाजू मांडली. अखेरीस न्यायालयात हा खटला अंतिम टप्प्यात पोहोचला आणि निकाल सुनावण्यापर्यंत प्रकरण गेले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts