Uddhav Thackeray: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. यानंतर ते कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित होते. यात अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज शिर्डीत पत्रकार परिषद राजकीय मुद्द्यावर चर्चा सुरु असतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर काय, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय उत्तर दिलं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय! नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; ५५ दिवसांत निकाल
शिर्डीतील मेळावा
शिर्डीतील हा मेळावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत( SanjayRaut) , खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) , आदित्य ठाकरे (Aditay Thackeray) , तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित आहेत. साई दर्शनानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
विधेयकांबाबत बोलताना उद्धव ठाकरे
संसदेत मांडल्या जाणाऱ्या विधेयकांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर भाष्य केले. कोणतेही महत्त्वाचे विधेयक आणण्यापूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. आमच्या सूचनांचा आणि आक्षेपांचा विचार झाला पाहिजे. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्हीही असू शकतो. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत भाष्य
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत भाष्य करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. महाराष्ट्रातील एखादा नेता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल तर त्यात गैर काही नाही, मात्र त्याला राष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत का, असा प्रश्न आपल्याला पडतो, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान झाला तर त्याला आपला पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी
डिलिमिटेशन आणि संसदेतील विधेयकांवर बोलताना ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत महिला आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी केली. मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा करावी, असेही त्यांनी सांगितले. “अशा फोडाफोडीचे राजकारण करून देश चालणार नाही,” असे ते म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही प्रश्न
मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. पूर्वी मुख्यमंत्री ठरवण्यात संघाची भूमिका महत्त्वाची होती, आता फोडाफोडीचे राजकारण त्यांना मान्य आहे का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे ठाकरे म्हणाले. या वक्तव्यांनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, भाजप आणि शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












