Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Teacher Recruitment Scam: शिक्षक भरतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह! नागपूर विभागातील 1,397 नियुक्त्यांची फेरपडताळणी
महाराष्ट्र

Teacher Recruitment Scam: शिक्षक भरतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह! नागपूर विभागातील 1,397 नियुक्त्यांची फेरपडताळणी

Teacher Recruitment Scam
63
Teacher Recruitment Scam: शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासानंतर शिक्षक नियुक्त्यांबाबत शिक्षण विभागाकडून मोठी पावले उचलली जात आहेत.

Teacher Recruitment 2026 Scam: शिक्षक नियुक्तीतील कथित अनियमिततेच्या चौकशीला आता आणखी वेग येण्याची शक्यता आहे. शालार्थ आयडी प्रकरणाच्या तापसादरम्यान काही शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित नियुक्तांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

नागपूर विभागातील ( Nagpur Department) तब्बल १३९७ शिक्षकांच्या नियुक्तांची पुन्हा तपासणी केली जाणार असून, ही प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत संबंधित शिक्षकांची नियुक्ती नेमकी कोणत्या पद्धतीने झाली, त्यांच्याकडे आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे होती का, याची छाननी केली जाणार आहे.

हेही वाचा: ठाण्यात प्रदीप पूर्णेकरांची हत्या; हल्ल्याआधी काय घडलं? भावाच्या दाव्याने प्रकरणाला नवं वळण

२०१२ नंतरच्या नियुक्त्यांवर विशेष लक्ष

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान २०१२ नंतर झालेल्या काही शिक्षक नियुक्त्यांमध्ये नियमांचे पालन झाले नसल्याचा संशय शिक्षण विभागाला आला होता. त्यामुळे नागपूर विभागातील संबंधित शिक्षाकांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावून त्यांच्या नियुक्तीशी संबंधित कागदपत्रे आणि निवड प्रक्रियेची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Teacher Recruitment 2026)

ही फेरपडताळणी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासणीत अनियमितता किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील नियुक्त्यांचीही चौकशी

शालार्थ आयडी प्रकरणानंतर आता 2012 पासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांकडेही लक्ष देण्यात आले आहे.

या नियुक्त्यांसाठी देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यतांच्या प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांच्या नेतृत्वाखाली समित्या कार्यरत आहेत. या समित्यांनी नागपूरमध्ये दोन दिवस मुक्काम करून सुमारे एक हजार प्रकरणांची प्राथमिक तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षण विभागातील अनियमितता तपासण्यावर भर

शालार्थ आयडी प्रकरणाच्या चौकशीत शिक्षक भरती आणि नियुक्ती प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर काही शिक्षण अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारांतर्गत विविध शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेल्या वैयक्तिक मान्यतांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पात्रता आणि कागदपत्रांची होणार छाननी

फेरपडताळणीदरम्यान संबंधित शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, नियुक्तीची प्रक्रिया आणि सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने:

संबंधित उमेदवार आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करत होता का?

नियुक्तीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार झाली होती का?

शैक्षणिक आणि इतर प्रमाणपत्रे वैध आहेत का?

नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे सादर करण्यात आली होती का?

संबंधित शिक्षक किंवा कर्मचाऱ्याची सध्याची सेवा स्थिती काय आहे?

यांसारख्या बाबींची पडताळणी केली जाणार आहे.

फेरपडताळणीनंतर चित्र स्पष्ट होणार

नागपूर विभागातील 1,397 शिक्षकांच्या नियुक्त्यांची फेरतपासणी पूर्ण झाल्यानंतर कोणत्या नियुक्त्यांमध्ये नियमांचे पालन झाले आणि कुठे अनियमितता आढळली, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोष किंवा नियमभंग आढळल्यास संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts