Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; पुण्यात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
Pune

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; पुण्यात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

MPSC Protest Pune
17
MPSC Protest Pune: पुण्यात एमपीएससी परीक्षार्थ्यांचे आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू झाले असून, विविध राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपापली भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) (MPSC Students Protest) संबंधित मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. काल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, पुण्यातील राजकीय वातावरणही तापले आहे.

पेपरफुटीच्या मुद्द्यावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक राजकीय नेत्याची उपस्थिती वाढल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

हेही वाचा: साताऱ्यात कौटुंबिक वादाचा धक्कादायक अंत! शिक्षक पित्याने १७ वर्षीय मुलीवर केला जीवघेणा हल्ला

विरोधी पक्षातील नेत्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी शिवसेना ( ठाकरे गट ) नेते संजय राऊत (Sanjay Raut MPSC Protest) , काँग्रेस नेते सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) नेत्या सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार विश्वजित कदम यांच्यासह अन्य नेत्यांनीही आंदोलकांची भेट घेतली आहे. ( LS Marathi News Channel )

आदित्य ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणामुळे रविवारी आंदोलनस्थळी जात आले नाही. मात्र, ते लवकरच विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

‘आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न’ : संजय राऊत

सरकारकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

त्याचवेळी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय हेतूसाठी वापर होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आला आहे.

मुरलीधर मोहोळ यांची रोहित पवारांवर टीका

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol MPSC) यांनी आंदोलनावरून आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमागे राजकारण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

मंत्री नीतेश राणे यांनीही रोहित पवार यांच्यावर टीका करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करू नये, अशी भूमिका मांडली.

दुसऱ्या आंदोलनस्थळीही नेत्यांची भेट

पुण्यातील अहिल्या अभ्यासिकेसमोरही एमपीएससी परीक्षार्थ्यांचे स्वतंत्र आंदोलन सुरू आहे. नीतेश राणे यांनी या ठिकाणी भेट देऊन आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

दरम्यान, एमपीएससीच्या (MPSC Exam 2026) परीक्षांशी संबंधित प्रश्न आणि पेपरफुटीच्या आरोपांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून कायम आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना आता सरकारकडून या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते, याकडे परीक्षार्थी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts