सध्याच्या डिजिटलायझेशनच्या युगात सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे दिसत असून तंत्रज्ञानाचा वेग आणि वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील तंत्रज्ञानावर भर दिला जात असून करियर निवडताना पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल देखील अभियांत्रिकी क्षेत्रात जास्त दिसून येतो. यामध्ये अभियांत्रिकी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ट (artificial intelligent) हे दोन्ही क्षेत्र फक्त तंत्रज्ञानच नाही तर आपलं जीवन आणि जगण्याची पद्धत देखील बदलत आहे. नुकताच सीईटी चा निकाल जाहीर झाला. यावरुन कॉम्प्युटर अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचं प्राथमिक अंदाजात दिसून आले. परंतु आजचे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्टचे जग एवढे पुढे आहे कि, बऱ्याच नोकऱ्या AI ने हडपल्याचे दिसते, असे असताना भविष्यात संगणक किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर नोकऱ्यांवर गदा येणार नाही हे कशावरून ?
कंप्यूटर इंजिनियरिंग केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होते.
यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी अफाट फीस वसूल केली जाते. परंतु मध्यमवर्गीय कुटुंबियांना ही संपूर्ण फीस भरणे अशक्य असताना शिक्षणासाठीचे लोन किंवा कोणत्याही प्रकारे पैश्यांचे नियोजन करून मुलांची इच्छा पूर्ण केली जाते. परंतु एआय ने या मुलांच्या नोकऱ्या हडपल्या तर काय होणार..? त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनीयरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकऱ्या मिळतीलच असं काही नाही. तसं बघायला गेलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्टने फक्त आयटी क्षेत्रच नाही तर पत्रकारिता, वैद्यकीय, कृषी, सायबर या क्षेत्रासह स्मार्ट सिटी, वाहतूक नियंत्रण, स्मार्ट शेती आणि कृषी रोबोट्स, हेल्थकेअर मध्ये AI निदान यंत्रणा, संरक्षण, अंतराळ संशोधन, आणि शिक्षणक्षेत्रात देखील आयटीने वाटचाल केल्याचे दिसून येते.
artificial inteligent म्हणजे काय तर मानवाप्रमाणे विचार करणारी संगणकीय प्रणाली. आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये सिरी किंवा गुगल असिस्टंट असो की , नेटफ्लिक्स , युट्युब यांच्यावर पसंती सुचवणे असो, एवढंच नाही तर वैद्यकीय विभागात रोग ओळखण्यासाठी असो सर्वत्र एआयचा वापर करण्यात येत असल्याचं निदर्शनात येतं. एआयचा प्रवेश आयटी क्षेत्रात जास्त असला तरीही वैचारिक ज्ञानाची आवश्यकता असलेल्या ठिकाणी एआय काही करू शकणार नाही. या एआयला कम्प्युटर अभियंताच हॅन्डल करू शकतो, असे असले तरीही एआय मुळे याच क्षेत्रातील सर्वाधिक नोकऱ्या एआय ने हडपल्या आहेत. एआय कार्यक्षमतेने चालण्यासाठी संगणक अभियंते जे प्लॅटफॉर्म, नेटवर्क, डेटा सिस्टिम तयार करतात, तीच मूळ ताकद आहे. AI चा वापर करणारे रोबोट, ड्रोन, वैद्यकीय यंत्रणा या सर्वामध्ये संगणक अभियांत्रिकीचा पाया असतो.
कंप्यूटर अभियांत्रिकी क्षेत्रातील एआयच्या रिलेटेड असलेल्या कोर्स मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी Python, C++, Java या भाषेवर प्रभुत्व मिळवणे फायद्याचे आहे, यासह AI/ML कोर्स: जसे कि Coursera, Udemy, IITs यासारखे ऑनलाईन कोर्स करायला हवे, यासह Chatbot तयार करणे, Facial Recognition App बनवणे Hackathons, Kaggle यावर प्रकल्प तयार करून कौशल्य वाढवणे याकडे जास्त भर द्यायला हवा. AI artificial inteligent आणि संगणक अभियांत्रिकी हे केवळ अभ्यासाचे विषय नसून आपले भविष्य घडवणारे स्तंभ आहेत. या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले तर आपल्या देशाला तंत्रज्ञानाच्या शिखरावर नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे.