Anil Ambani assets seized : एकेकाळी जगातील सर्वात अमीर व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांचे छोटे बंधू अनिल अंबानी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार बघितलेत. अशातच आता एका कर्ज घोटाळ्या प्रकरणी अनिल अंबानी यांच्यावर कारवाईचा फास आवळण्यात येत आहे. त्यानुसार त्यांच्या डोक्यावरचा छत्र हरपण्याची वेळ आल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
अनिल अंबानी यांचे मुंबईतील पाली हिल या ठिकाणी असलेले घर, दिल्ली, नोएडा, मुंबई, गोवा, पुणे, हैदराबाद, चेन्नई यासारख्या शहरांमधील रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स इंट्रोडक्शन लिमिटेड चे फ्लॅट्स प्लॉट आणि कार्यालय जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
येस बँकेच्या 3000 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात अंबानी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार ईडी आणि सीबीआयच्या चौकशीनंतर अनिल अंबानी यांनी समूह कंपन्याविरुद्ध कर्ज घोटाळ्याच्या मनी लॉन्ड्री चौकशीच्या संदर्भामध्ये ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची अनेक कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मनी लॉंडरिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये 3000 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली असून या जप्तीवर सविस्तर निवेदन जारी करण्यात आल्याची माहिती एका गुप्त अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. यापूर्वी देखील ईडीने जुलै महिन्यात अंबानी त्यांचे सहकारी आणि समूह कंपन्यांवर अनेक छापेमारी केली होती.
हे हि वाचा : अमेरिकेतील सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी फोर्ड मोटर्स पुन्हा भारतात; मोठ्या प्रमाणात करणार गुंतवणूक
मिळालेल्या माहितीनुसार ईडी ने दिलेल्या जप्तीच्या आदेशांमध्ये अंबानी समूहाच्या कंपन्यांनी बँक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. या आरोपानुसार निधी शेल कंपन्या आणि समूहाच्या स्वतःच्या कंपन्याकडे वळवण्यात आलेले पैसे जप्त केले जाऊ शकतात. एवढेच नाही तर कॉर्पोरेट कर्जाचा एक मोठा भाग रिलायन्स समूहाच्या कंपन्यांच्या खात्यात जमा झाला असून पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार त्यांची मालमत्ता पुढील आठवड्यात जप्त होण्याची चर्चा रंगत आहे.
कसे आहे अंबानी यांचे घर (Anil Ambani assets seized)
अनिल अंबानी यांची मुंबई येथे 17 मजली घर आहे. त्यांचा हा बंगला मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे. या घराचे नाव Abod ठेवण्यात आले असून या इमारतीची उंची 66 मीटर एवढी आहे. या इमारतीच्या रूफटॉप वर हेलीपॅड बनवण्यात आले असून या ठिकाणी सर्व हेलिकॉप्टर एकाच वेळी लँड करू शकतात. या घरात अनिल अंबानी यांनी जिम आणि गॅरेज देखील सुरू केले आहे.












