Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ओला उबेर ची अरेरावी संपणार, लवकरच सुरू होणार आता भारत टॅक्सी सर्विस
बिजनेस

ओला उबेर ची अरेरावी संपणार, लवकरच सुरू होणार आता भारत टॅक्सी सर्विस

India Taxi Service launch : शहरात विविध ठिकाणी ओला उबेर ह्या ॲप बेस्ड टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या ओला उबेर ॲप बेस्ट टॅक्सी यांचा मनमानी कारभार प्रवाशांना भोगावा लागतो. बऱ्याचदा हे टॅक्सी चालक प्रवाशांकडून भाड्यापेक्षा जास्त पैसे उकळतात. परंतु आता ॲप बेस् ओला उबेर या टॅक्सी धारकांची मनमानी संपणार आहे. कारण आता देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा म्हणजेच भारत टॅक्सी ओला उबेर ला टक्कर देण्यासाठी पुढे सरसावली आहे.

शहरातील उबेर ओला अँप बेस् टॅक्सी चालकांच्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात. बऱ्याचदा भाडे जास्त घेणे, ओला उबेर टॅक्सी खराब असणे. ओला उबेर टॅक्सी मध्ये अस्वच्छता असणे अशा समस्यांमुळे प्रवाशांची तारांबळ उडते. प्रवाशांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु आता या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरकारच्या मदतीने भारत टॅक्सी ही सर्विस सुरू करण्यात आली आहे.

ही सरकारने सुरू केलेली भारत टॅक्सी सर्विस ओला उबेर या खाजगी कॅप सेवा कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. कारण या भारत टॅक्सी कार मालक आणि चालकांना कंपनीला कोणतेही कमिशन द्यावे लागणार नसल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे आता संपूर्ण उत्पन्न कार चालक त्यांच्या खिशात घालू शकतात. म्हणजेच आता प्रवासी ओला उबेर यांची अरेरावी न जुमानता भारत टॅक्सी सर्विस वापरू शकतील.

भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सर्विस असून ही सर्विस लवकरच डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये या सर्विस चा पायलेट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. या पायलेट प्रोजेक्टमध्ये 650 चालक आणि वाहन मालक सहभागी असतील. त्यानंतर ही सर्विस डिसेंबर पासून विस्तारली जाईल आणि हळूहळू देशभरात पोहोचेल.

असा होईल प्रवाशांना फायदा

ओला उबेर ज्याप्रमाणे भाड्याची लूट करत होते ती थांबली जाईल. भारत टॅक्सीचे भाडे हे निश्चित आणि कमी असेल. भारत टॅक्सी पोलीस ठाण्याची देखील कनेक्ट राहील. याशिवाय या भारत टॅक्सी मध्ये डिस्ट्रेस बटन समाविष्ट केले जाणार आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे बटन दाबल्या जवळच्या पोलीस ठाण्याला अलर्ट मिळेल. म्हणजेच महिला प्रवासी देखील सुरक्षित राहतील.

 हे हि वाचा : Silver Gold Price Fall : चांदीची किमती विक्रमी उच्चांकावरुन 21% नं घसरली; सोनंही 7.46% नं स्वस्त

महिला चालकांचा देखील समावेश

भारत टॅक्सीच्या वाहन चालकांना कमिशन ऐवजी सबस्क्रीप्शन फीज आकारली जाणार आहे. म्हणजे ड्रायव्हरला प्रत्येक राईड मधून मिळणाऱ्या कमाईच्या 100% रक्कम मिळेल. आणि त्यांना फक्त दैनिक साप्ताहिक किंवा मासिक शुल्क भरावे लागू शकते. भारत टॅक्सी मध्ये महिला चालकांचा देखील समावेश असणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 महिला सहभागी होतील. आणि 2030 पर्यंत 15000 पर्यंत ही संख्या पोहोचण्याची शक्यता आहे.

भारत टॅक्सीचे चालक देखील सहमालक असणार (India Taxi Service launch )

भारत टॅक्सी ही केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय गव्हर्नर विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार को ऑपरेटिव्ह लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार भारत टॅक्सी ही एक खाजगी नाही तर सहकारी कंपनी म्हणून काम करेल. जेणेकरून भारत टॅक्सीचे चालक देखील सहमालक असतील.

भारत टॅक्सी ॲप

भारत टॅक्सी सर्विस चा वापर करण्यासाठी ओला उबेर प्रमाणेच भारत टॅक्सी ॲप इन्स्टॉल करावे लागेल. अँड्रॉइड युजर साठी हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असेल. तर आयफोन युजर साठी एप्पल स्टोअरवरून इन्स्टॉल करावे लागेल. हे ॲप हिंदी इंग्रजी गुजराती आणि मराठी या भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts