Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत इंडिगोनं रिफंड प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा…; सरकारच्या कडक सूचना
बिजनेस

रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत इंडिगोनं रिफंड प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा…; सरकारच्या कडक सूचना

IndiGo aircraft at the airport with passengers affected by flight cancellations and refund delays

IndiGo refund deadline : भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या पाच दिवसांपासून गंभीर संकटाचा सामना करत आहे. आज सलग पाचव्या दिवशी, मोठ्या संख्येनं इंडिगो उड्डाणं रद्द आणि विलंबित करण्यात आली आहेत. दरम्यान, भारतीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं प्रवाशांच्या परतफेडीबाबत इंडिगोला कडक सूचना जारी केल्या आहेत. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला सर्व प्रभावित प्रवाशांचे प्रलंबित परतफेड विलंब न करता करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

परतफेडीला विलंब झाल्यास कठोर कारवाई :

नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीला रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:00 वाजेपर्यंत सर्व रद्द केलेल्या किंवा विलंबित उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रद्दीकरणामुळं ज्या प्रवाशांच्या प्रवास योजनांवर परिणाम झाला आहे त्यांच्याकडून कोणतेही पुनर्निर्धारण शुल्क आकारु नये असे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा नियमांचं पालन न केल्यास तात्काळ नियामक कारवाई केली जाईल.

हे ही वाचा : इंडिगो संकट: आजही 300 हून अधिक उड्डाणं रद्द; दिल्ली-बेंगळुरु विमानाचं तिकिट 50 हजारांवर, प्रवाशांचे प्रचंड हाल

शनिवारी 300 हून अधिक उड्डाणं रद्द :

हे लक्षात घ्यावं की इंडिगोनं शनिवारीही शेकडो उड्डाणं रद्द केली. आज रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये सर्वाधिक मुंबईची संख्या होती, त्यानंतर दिल्लीहून 109, हैदराबादहून 69, पुण्याहून 42, अहमदाबादहून 19, लखनऊहून 8 आणि तिरुवनंतपुरमहून 6 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीहून बेंगळुरु, गोवा, मुंबई, अहमदाबाद, जबलपूर, चेन्नई, विजयवाडा आणि आगरतळा येथे जाणारे अनेक उड्डाणं पूर्णपणे रद्द करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, इतर अनेक मार्गांवरील इंडिगोच्या उड्डाणांना 5 ते 6 तासांचा विलंब होत आहे, ज्यामुळं प्रवाशांची गैरसोय वाढत आहे.

 

परिस्थिती सामान्य होण्यास बराच वेळ लागेल :

एफडीटीएल नियम शिथिल केल्यानंतर, इंडिगो एअरलाइन्सची उड्डाणं हळूहळू कमी संख्येनं उड्डाणं सुरु झाली आहेत. मात्र, चेक-इन काउंटरवर अजूनही लोकांच्या लांब रांगा लागत आहेत. इंडिओचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले की, कामकाज पूर्णपणे सामान्य होण्यास आणखी काही दिवस लागतील.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts