new rules from today India 2025 : आज पासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे आजपासून देशभरात पाच नियम बदलले आहेत. याचा परिणाम तुमच्या खिशाला होऊ शकतो. तुम्ही सणासुदीच्या काळात काही कामे पुढे ढकलली असतील तर या महिन्यात त्या कामावर काही परिणाम होईल का हे जाणून आपण आज घेणार आहोत.
आज पासून म्हणजेच एक नोव्हेंबर पासून संपूर्ण देशभरात नियम बदलण्यात आले आहे. यामध्ये आधार कार्ड, बँक प्रणाली, क्रेडिट कार्ड, गॅस सिलेंडर , म्युच्युअल फंड यासारख्या सर्व नियमांचा समावेश असणार आहे. तर मग जाणून घेऊया कोणकोणते आहेत नवीन नियम आणि याचा परिणाम काय होणार.
आधार कार्ड
यूआयडीएआयने म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया अधिक सोपी बनवली आहे. त्यासाठी आता तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर यासंबंधित माहिती अपडेट करण्यासाठी आधार सेतू केंद्रावर जाण्याची गरज नसणार आहे. म्हणजेच तुम्ही हे सर्व बाबी आता ऑनलाइन पण भरू शकतात. जर तुम्हाला बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट आयरिस स्कॅन यासारख्या बाबी अपडेट करायच्या असतील तर तुम्हाला या केंद्रावर जावे लागेल.
याशिवाय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया तुमच्या माहितीची पडताळणी पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, मनरेगा किंवा शाळा नोंदी यासारख्या सरकारी डेटाबेस सोबत स्वयंचलित पद्धतीने म्हणजेच ऑटोमॅटिक वेरिफिकेशन करणार आहे. म्हणजेच तुम्हाला कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज राहणार नाही. यामुळे आधार कार्ड अपडेट करणे सोपे होईल.
एसबीआय क्रेडिट कार्ड
तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डधारक असाल तर आज पासून तुमच्यासाठी नवीन नियम लागू होत आहे. त्यानुसार अनसिक्युअर कार्ड्स वर 3.75% शुल्क लागू करण्यात येणार आहे. तर क्रेड, चे क्यू, मोबिक सारखे थर्ड पार्टी ॲप द्वारे तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयाची फीस भरल्यास तुम्हाला एक टक्का अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. परंतु जर तुम्ही शाळेच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा पीओएस मशीनच्या माध्यमातून पेमेंट केले तर कोणताही प्रकारचे शुल्क आकारल्या जाणार नाही. यासह 1000 पेक्षा जास्त वॉलेट लोड केल्यास तुम्हाला एक टक्के शुल्क आणि कार्डद्वारे चेक पेमेंट केल्यावर 200 रुपयाचा चार्ज लागणार आहे.
म्युच्युअल फंड
सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीत पारदर्शकता वाढवण्यासाठी नियम लागू केले आहेत. त्या अनुषंगाने एखाद्या एएमसीच्या AMC म्हणजेच asset management company च्या अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिकचा व्यवहार केल्यावर कंपनीला संपूर्ण माहिती कॉम्प्लायन्स ऑफिसर यांना देणे बंधनकारक असेल. गुंतवणुकीच्या माध्यमातून हा निर्णय हिताचे रक्षण करण्याचा असून इनसाईडर ट्रेडिंग वर बॅन करण्यासाठी घेण्यात आला आहे.
बँक खाते आणि लॉकर नॉमिनी
बँकिंग कायदा अधिनियम 2025 नुसार ग्राहक आता बँक खाते लॉकर आणि सेट कस्टडीसाठी एका ऐवजी चार नॉमिनी ठेवू शकतात. यासोबतच आता ग्राहक कोणत्या नॉमिनीला किती हिस्सा द्यायचा हे देखील ठरवू शकतात. पहिला नॉमिनी हयात नसेल तर त्याचा हिस्सा आपोआप दुसरा नॉमिनीकडे हस्तांतरित केला जाईल. जेणेकरून भविष्यातील विवाद कमी होण्याची शक्यता आहे.
एलपीजी गॅस सिलेंडर (new rules from today India 2025)
प्रत्येक महिन्यात एलपीजी सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये बदल होत असतो. त्या अनुषंगाने या महिन्यात हा नियम बदलला आहे. त्यानुसार आता एलपीजी सीएनजी पीएनजीच्या दरांची समीक्षा केली जाणार आहे.












