Post Office recurring deposit scheme : मिडल क्लास परिवाराला वाढत्या महागाई मुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विज बिल, पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, किराणाचे वाढते दर, भाज्यांचे वाढते भाव हे सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. त्यामुळे त्यांचे वर्षाचे आर्थिक बजेट कोलमडते. यावेळी पैशांची बचत करून ठेवणे, भविष्यासाठी सेविंग करणे अवघड जाते. पण तुम्ही अशा वेळेस देखील सेविंग करू शकतात. तेही सोप्या पद्धतीने. मार्केटमध्ये बऱ्याच अशा स्कीम आणि ऑफर्स उपलब्ध आहे ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.
रेकरींग डिपॉझिट स्कीम
देशाची सर्वात मोठी सरकारी संस्थांमधील एक असलेली पोस्ट ऑफिस एक योजना घेऊन आलेली आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला बंपर रिटर्न मिळू शकतो. या योजनेचे नाव रेकरींग डिपॉझिट स्कीम असं आहे. या स्कीम मध्ये बऱ्याच सुविधा दिल्या जातात. त्याचबरोबर या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच शर्ती देण्यात आलेले आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये 10 वर्षाच्या पुढील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नसून तुम्ही फक्त 100 रुपये महिन्यात जास्त रिटर्न मिळवू शकतात. त्याचबरोबर आता केंद्र सरकारने नुकतेच रेकरिंग डिपॉझिट वर व्याजदर 6.2% वरून 6.5% केला आहे.
या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्हाला 6.5 टक्के व्याज दिल्या जाईल. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी 5 वर्षे किंवा 60 महिने पैसे गुंतवणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढू शकतात. त्याचबरोबर तुम्ही एका वर्षानंतर 50% पर्यंत कर्ज देखील येऊ शकतात.
एवढा मिळेल परतावा
पोस्ट ऑफिस ची रेकरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यावर रिटर्न सुद्धा चांगला मिळतो. जर तुम्ही या योजनेमध्ये प्रत्येक दिवशी 33 रुपये म्हणजेच दर महिन्याला 10000 गुंतवले तर तुम्हाला 10 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. 10 वर्षात तुम्हाला 5.8% व्याजानुसार 16 लाख रुपये दिले जातील. म्हणजेच 10 वर्षात तुमचे 12 लाख रुपये जमतील. त्यानंतर त्याच्यावर अंदाजे परतावा सुमारे 4.26 लाख रुपयांपर्यंत होईल. त्यानुसार तुम्हाला 16.26 लाख रुपये मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेमध्ये जर तुम्ही प्रत्येक दिवशी 66 रुपये गुंतवले तर महिन्याला 2000 रुपये होतील. म्हणजे वर्षभरात तुम्ही 24 हजार रुपये गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक 5 वर्षांनंतर 1,20,000 रुपये होईल. यावर तुम्हाला 21,983 रुपये व्याज मिळू शकेल. आणि मॅच्युरिटी पर्यंत तुम्हाला 1,41,983 रुपये व्याज मिळू शकते.
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट मध्ये 133 रुपये दररोज गुंतवले तर महिन्याला 4000 रुपये तुम्ही गुंतवू शकतात. म्हणजेच वर्षभर तुम्ही 48000 रुपये जमा होतील. आणि पाच वर्षानंतर 1,20,000 रुपये जमतील. यावर तुम्हाला 43 हजार 968 रुपये व्याज मिळू शकते. त्यानंतर मॅच्युरिटी वर 2 लाख 83 हजार 968 रुपये तुम्हाला मिळू शकतात. (Post Office recurring deposit scheme)












