Sensex falls 130 points : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली, ज्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बीएसई सेन्सेक्स 85,102.69 वर बंद झाला, यात 609.68 अंकांनी (0.71%) मोठी घसरण झाली. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 50 निर्देशांक देखील 225.90 अंकांनी (0.86%) घसरुन 25,960.55 वर बंद झाला. आजच्या तीव्र घसरणीची अनेक कारणं सांगितली जात आहेत, ज्यात भारतीय रुपयातील तीव्र घसरण, फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांची वाट पाहणे आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात बाजार स्थिर राहिला हे लक्षात घेतलं पाहिजे.
सेन्सेक्सचा फक्त एकच शेअर हिरव्या रंगात बंद :
सोमवारी, सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी फक्त एकच शेअर टेक महिंद्रा 1.32% वाढून हिरव्या रंगात बंद झाला, तर उर्वरित 29 कंपन्या घसरुन बंद झाल्या. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 पैकी फक्त तीन कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित 47 कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, बीईएलचे शेअर्स 4.88 टक्क्यांच्या सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाले.
हे ही वाचा : देशांतर्गत शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 130 अंकांनी घसरला, निफ्टीही 26,144 च्या जवळ
सेन्सेक्समधील उर्वरित कंपन्यांच्या शेअर्सचं काय झालं? :
सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये, एटरनलचे शेअर्स 2.53 टक्के, ट्रेंट 2.48 टक्के, टाटा स्टील 2.21 टक्के, बजाज फायनान्स 2.14 टक्के, अदानी पोर्ट्स 1.98 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.82 टक्के, एसबीआय 1.69 टक्के, पॉवरग्रिड 1.66 टक्के, एशियन पेंट्स 1.52 टक्के, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स 1.51 टक्के, टायटन 1.40 टक्के, एनटीपीसी 1.36 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.35 टक्के, एल अँड टी 1.19 टक्के, भारती एअरटेल 1.10 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.04 टक्के, अॅक्सिस बँक 1.00 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 0.86 टक्के, सन फार्मा 0.83 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.69 टक्के, आयटीसी 0.65 टक्के, मारुती सुझुकीचे शेअर्स 0.60 टक्के वधारले. इन्फोसिस 0.54 टक्क्यांनी, आयसीआयसीआय बँक 0.26 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 0.20 टक्क्यांनी, रिलायन्स 0.14 टक्क्यांनी, एचसीएल टेक 0.09 टक्क्यांनी आणि टीसीएस 0.07 टक्क्यांनी घसरून बंद झाले.











