Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्सनं ओलांडला 83,000 चा टप्पा, निफ्टीमध्येही जोरदार उसळी
ताज्या बातम्या

शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्सनं ओलांडला 83,000 चा टप्पा, निफ्टीमध्येही जोरदार उसळी

Share Market Today

Share Market Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 276.69 अंकांनी म्हणजेच 0.33% नं वाढून 83,091.40 वर पोहोचला. सेन्सेक्सच्या या हालचालीमुळं गुंतवणूकदारांना बाजार तेजीत राहील असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक, निफ्टी 72.30 अंकांनी म्हणजेच 0.28% नं वाढून 25,643.55 वर पोहोचला. मात्र, काही सुरुवातीच्या अपडेट्समध्ये असंही सूचित केलं आहे की निफ्टी 26000 च्या पुढं जाऊ शकतो, जे बाजारातील मजबूत तेजीचे संकेत देते. आठवड्याच्या शेवटी बाजाराच्या दिशेबद्दल चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांना या तेजीमुळं दिलासा मिळाला आहे.

सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर्सची सकारात्मक सुरुवात :

सोमवारी, सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर्सनी वाढीसह हिरव्या रंगात व्यवहार सुरु केले, तर उर्वरित 10 कंपन्यांनी तोट्यासह लाल रंगात व्यवहार सुरू केले. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 पैकी 39 कंपन्या हिरव्या रंगात उघडल्या, तर उर्वरित 11 कंपन्या तोट्यात उघडल्या. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स सर्वाधिक 1.21 टक्के वाढीसह उघडले, तर क्वालिटी वॉल्स इंडियाचे शेअर्स आज सर्वाधिक घसरले, 2.63 टक्के घसरले.

सेन्सेक्समधील प्रत्येक शेअर कसा उघडला? (Share Market Today ) :

सेन्सेक्समधील उर्वरित समभागांमध्ये एचडीएफसी बँक 0.86 टक्के, टेक महिंद्रा 0.67 टक्के, बजाज फायनान्स 0.65 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.55 टक्के, अदानी पोर्ट्स 0.53 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.49 टक्के, भारती एअरटेल 0.40 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 0.38 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 0.32 टक्के, टायटन 0.22टक्के, बीईएल 0.20 टक्के, इटरनल 0.19 टक्के, सन फार्मा 0.16 टक्के, एसबीआय 0.15 टक्के, पॉवर ग्रिड 0.15 टक्के, मारुती सुझुकी 0.14 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.14 टक्के, आयटीसी 0.14 टक्के आणि टाटा स्टील 0.12 टक्के वधारले.

दुसरीकडे, आज इन्फोसिसचे शेअर्स 0.70 टक्के, एशियन पेंट्स 0.66 टक्के, इंडिगो 0.41 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.32, एचसीएल टेक 0.29 टक्के, ट्रेंट 0.26 टक्के, एनटीपीसी 0.08 टक्के, टीसीएस 0.08 टक्के आणि एल अँड टीचे शेअर्स 0.04 टक्क्यांनी घसरले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts