Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Mumbai

शाळेच्या बसवर झाड कोसळलं , अनेक मुलं अडकले..

चेंबूर शाळेच्या बसवर झाड कोसळलं

चेंबूर शाळेच्या बसवर झाड कोसळलं :

मुंबईच्या उपनगरीय भागातील चेंबूर परिसरात आज दुपारी एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरवून सोडलाय. चेंबूरमधील वर्दळीच्या ११ नंबर रोडवर एका शाळेची बस नियमित वेळेनुसार विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना, अचानक रस्त्याच्या कडेला असलेले एक जुने आणि मोडकळीस आलेले प्रचंड मोठे झाड या धावत्या स्कूलबसवर कोसळले आहे.चेंबूर शाळेच्या बसवर झाड कोसळलं या भीषण अपघातात स्कूलबसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून प्राथमिक माहितीनुसार १० शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर बसच्या मागच्या बाजूला एक लहान मुलगा लोखंडी पत्र्यांमध्ये आणि झाडाच्या अवजड फांद्यांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिवसभर मुंबई आणि उपनगरात सातत्याने पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे या झाडाची पाळेमुळे ठिसूळ झाली होती, ज्यामुळे हा घात झाला असल्याचे समोर येत आहे. ही घटना घडताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. चेंबूरमधील ११ नंबर रोडवर बस दुपारच्या सुमारास आल्यानंतर हा अपघात घडला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच संपूर्ण मुंबईत आणि विशेषतः चेंबूर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस सुरू होता. या संततधार पावसामुळे माती मऊ झाली होती आणि आधीच मोडकळीस आलेल्या या जुन्या झाडाचा भार जमिनीला पेलवला नाही. बस अगदी त्या झाडाच्या खालून जात असतानाच, एका क्षणात हे अजस्त्र झाड मुळासकट उखडून थेट बसच्या मधोमध आणि समोरील भागावर कोसळले आहे. चेंबूर शाळेच्या बसवर झाड कोसळलं,झाडाचा प्रचंड भार आणि वेग यामुळे बसचे टप पूर्णपणे दबले गेले आणि खिडक्यांचे पत्रे आतल्या बाजूला चिरडले गेले आहेत.

शाळेच्या बसवर झाड कोसळलं :

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील लहान मुलांना काय घडते आहे हे समजण्याच्या आतच ते अडकले. अपघात घडताच आजूबाजूच्या दुकानदार, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांनी तातडीने बसच्या दिशेने धाव घेतली. बसमधून मुलांचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता. स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवत पोलिसांना आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. तसेच प्रशासनाची वाट न पाहता स्वतःहून बचावकार्य सुरू केले. त्यांनी बसच्या खिडक्या आणि मागचा दरवाजा तोडून आत मधील लहान मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.. अपघाताची भीषणता इतकी जास्त होती की बसच्या सीट आणि छताचा पत्रा एकमेकांत अडकल्यामुळे मुलांना बाहेर काढण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. सुरुवातीला १० जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती आहे. या मुलांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापती झाल्या असून काहींच्या अंगावर झाडाच्या लहान फांद्या पडल्याने ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. या सर्व जखमी १० मुलांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

हेही वाचा : मरीन ड्राइव्हवर समुद्रातून वाहून आलेला रहस्यमय सागरी जीव; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडिओ व्हायरल

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल, मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशामक दलाचे जवान अनेक गाड्यांसह आणि रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. परंतु, बचावकार्य सुरू असतानाच एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली. बसमध्ये एक शाळकरी मुलगा अजूनही अडकून पडला आहे.. हा मुलगा आतमध्ये अडकल्याचे समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ गॅस कटर, हायड्रॉलिक जॅक आणि क्रेन सारख्या आधुनिक यंत्रांचा वापर करून अतिशय सावधगिरीने बचावकार्य सुरू केले. पाऊस सतत सुरू असल्यामुळे आणि झाडाचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे जवानांना काम करण्यात अनेक अडथळे येत आहेत. मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवान शर्तीचे प्रयत्न करत असून संपूर्ण प्रशासन सध्या या एका मुलाच्या सुटकेसाठी एकवटले आहे.

चेंबूर शाळेच्या बसवर झाड कोसळलं :

घटनास्थळावर वैद्यकीय पथक देखील सज्ज ठेवण्यात आले आहे, जेणेकरून मुलाला बाहेर काढताच त्याला जागेवरच प्रथमोपचार देता येतील. या भीषण दुर्घटनेमुळे चेंबूर ११ नंबर रोड आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातग्रस्त स्कूलबस रस्त्याच्या मधोमध असल्याने आणि बचावकार्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या उभ्या असल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गांवर वळवली आहे. तसेच दुर्घटनास्थळी उत्सुक नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे,

या घटनेची माहिती मिळताच जखमी मुलांच्या पालकांनी रुग्णालयात आणि घटनास्थळावर धाव घेतली असून परिसरात सध्या अत्यंत तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक रहिवाशांनी या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोडकळीस आलेले आणि धोकादायक ठरलेले हे झाड कापण्याबाबत किंवा छाटण्याबाबत यापूर्वी स्थानिक प्रशासनाला कळवण्यात आले होते, असा दावा नागरिकांनी केला आहे. दिवसभर पडणाऱ्या रिमझिम पावाने या जुन्या झाडाचा पाया पूर्णपणे कमकुवत केला आणि अखेर ते निष्पाप मुलांच्या बसवर कोसळले. अशा धोकादायक झाडांकडे पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच लक्ष देणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत आहे. फिलहाल, अडकलेल्या त्या एका विद्यार्थ्याला सुखरूप बाहेर काढणे हेच प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असून संपूर्ण चेंबूरवासीय या मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत.

Youtube : youtube.com/channel/UC5tZ7UVY_IuOv88_eQSVMdg

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts