Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • 108 रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार उघड; गंभीर रुग्ण दोन तास अडकला, जीव धोक्यात
Top News

108 रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार उघड; गंभीर रुग्ण दोन तास अडकला, जीव धोक्यात

Critical patient stranded for two hours due to mismanagement of 108 ambulance service

108 Ambulance Mismanagement : राज्य शासनाची तत्पर सेवा म्हणून ओळख असलेली 108 रुग्णवाहिका सेवा पैठण तालुक्यात अक्षरशः बेजबाबदारपणे चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोड ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिकेच्या निष्काळजीपणामुळे एका गंभीर जखमी महिलेचा जीव धोक्यात आल्याची घटना आज सायंकाळी घडली.

छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील मुरमा गावात आज सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत एका महिलेला डोक्याला व खांद्याला गंभीर मार लागला. पाचोड पोलीस ठाण्याने तत्काळ जखमी महिलेला उपचारासाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीनंतर डोक्याला गंभीर दुखापत असल्याने तातडीने सिटीस्कॅन व पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यास सांगितले. आणि इथूनच प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला.

रुग्णवाहिका असूनही रुग्ण अडकला

पाचोड ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात 108 रुग्णवाहिका उभी असतानाही तब्बल दोन तास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी सतत 108 क्रमांकावर संपर्क साधूनही कोणतीही मदत मिळाली नाही.

हे ही वाचा : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळ्यात उत्पादन शुल्क विभागाचा सापळा, ट्रक-स्कॉर्पिओ सह ४३ लाखांचा माल जप्त

रुग्णवाहिका चालकाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेतील डॉक्टर कोणालाही वरिष्ठांना कल्पना न देता चालू ड्युटीवरून बाहेरगावी गेले आहेत. “डॉक्टर येईपर्यंत मी गाडी घेऊन जाणार नाही,” अशी भूमिका चालकाने घेतल्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्ण अक्षरशः रुग्णालयातच अडकून पडला.

निष्काळजीपणामुळे जीव धोक्यात

108 ही आपत्कालीन सेवा असताना, डॉक्टर व चालक यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. ही सेवा रुग्ण व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे की कर्मचाऱ्यांच्या मनमानीसाठी, असा संतप्त सवाल नातेवाईक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार?

या गंभीर प्रकारामुळे 108 रुग्णवाहिका सेवा, पाचोड ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित रुग्णवाहिका चालक व डॉक्टरांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कठोर कारवाई करतात, की नेहमीप्रमाणे या प्रकरणावर पडदा टाकला जातो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts