• Home
  • महाराष्ट्र
  • पुणे-सातारा महामार्गावरील सारोळ्यात उत्पादन शुल्क विभागाचा सापळा, ट्रक-स्कॉर्पिओ सह ४३ लाखांचा माल जप्त
गुन्हा

पुणे-सातारा महामार्गावरील सारोळ्यात उत्पादन शुल्क विभागाचा सापळा, ट्रक-स्कॉर्पिओ सह ४३ लाखांचा माल जप्त

Excise department officials seize truck and Scorpio with goods worth 43 lakh rupees at Sarola on Pune Satara highway

Excise department seizure Pune Satara highway : गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी (दि. १७ डिसेंबर) साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे विभागाने पुणे-सातारा महामार्गावर सारोळे (ता. भोर) येथे सापळा रचून संबंधित सहा चाकी ट्रक ताब्यात घेतला.

ट्रकचालकाची कसून चौकशी केली असता हा मद्यसाठा आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) येथे पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कोणालाही संशय न येऊ देता ट्रक आंबेगाव येथे नेला. तेथे माल घेण्यासाठी आलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. पुढील कारवाईदरम्यान संबंधित आरोपीच्या राहत्या घरातूनही अतिरिक्त मद्यसाठा सापडला.

हे ही वाचा : फसवणूक, मानसिक छळामूळे शेतकऱ्याची आत्महत्या; मुलांने केली पोलीसात तक्रार दाखल

या कारवाईत सहा चाकी ट्रक, स्कॉर्पिओ वाहनासह एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आज दोन्ही आरोपींना मा. भोर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.

ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. बरगे, दुय्यम निरीक्षक एस. सी. शिंदे, दुय्यम निरीक्षक पी. एम. मोहिते, जवान डी. के. पिलावरे, जवान पी. आर. सुर्यवंशी, महिला जवान मनिषा भोसले, जवान अंकुश कांबळे व जवान मोहन गवळी यांच्या पथकाने केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts