Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
ताज्या बातम्या

नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Election officials preparing for vote counting of municipal council and nagar panchayat elections
93

Municipal council election counting preparations :- रत्नागिरी जिल्ह्यातील 4नगर परिषद आणि 3 नगर पंचायतीच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाकडे २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार न्यायालयीन अपिल दाखल झाल्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेमधील प्रभाग क्र. १० (१० अ व १० ब) करीता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ४ मतदान केंद्र राहणार आहे.

हे ही वाचा : ….तर माणिकराव कोकाटेंना अटक होणार ? अँजिओग्राफीचा अहवाल न्यायालयात सादर करणार

दरम्यान, याआधी जिल्हातील सात नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या १०० प्रभागात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यात ६८.१४ टक्के मतदान झाले. स्ट्राँग रुमसाठी एसआरपी व पोलीस यांच्यामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सिक्युरिटी ऑडीट करण्यात आले आहे. सुरक्षा कक्षामध्ये व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही व्यवस्था बसविण्यात आली आहे. अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात आली असून, व्हॅक्युम क्लिनर व्यवस्था, वाळवी पेस्ट कंट्रोल उपाययोजना करण्यात आली असल्याचे श्री. जिंदल यांनी सांगितले.

२१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले. रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यातील प्रशासन, निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts