Appeal of the morch : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आनंद हॉटेलच्या पाठीमागील परिसरातून तरुणी, तिची आई आणि भाऊ तिघेजण घराकडे जात असताना दोघा संशयितांनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल मिरचीची चटणी टाकत तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून पळवून नेल्याचा प्रकार घडला.
हेही वाचा – ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; आरोपीमध्ये ASI अधिकाऱ्याचा समावेश
या घटनेनंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी करत काही काळ ठिय्या आंदोलन केले… त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते… घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. आणि संपूर्ण जिल्ह्यात संभाव्य मार्गांवर आणि टोलनाक्यावर नाकाबंदी करण्यात आली असून एक पथक आरोपींच्या मागावर पाठवून आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलीये.
जहीर शेख आणि आयान शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेमुळे भिगवणसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी जहीर हारुण शेख आणि आयान हारुण शेख या दोघांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आज आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर हे भिगवण बंद मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
आरोपींमध्ये महिनाभरापासून सुरू संभाषण होतं
भिगवण तरुणीच्या अपहरण प्रकरणी आरोपींमध्ये महिनाभरापासून सुरू संभाषण होतं. दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत असल्याची पोलिसांची माहिती आहे. अपहरण झालेली तरुणी आणि आरोपींचे घर शेजारी शेजारी आहे. अपहरण झालेल्या तरुणीच्या शोधासाठी सहा पोलिसांची पथके रवाना करण्यात आले आहेत.
आरोपींना तात्काळ अटक करण्याची आंदोलनकर्त्यांकडून मागणी
भिगवण पोलीस स्टेशन समोर कुटुंबातील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या घटनेचा संतापजनक निषेध व्यक्त करत काही काळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले. यानंतर संतप्त नागरिकांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ केल्याच चित्र पाहायला मिळालं असून यावेळी आरोपींना तात्काळ अटक करण्याची आंदोलनकर्त्यांकडून मागणी करण्यात आली, यानंतर या घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण बंदची हाक देण्यात आली असून आज सकाळपासून संपूर्ण भिगवण शहर कडकडीत बंद आहे…तसेच संपूर्ण परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.












