Nashik ACB action : नाशिकच्या वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खाजगी इसमाला एक कोटी रुपयांची लाच करताना लाच लचपत प्रतिबंधक विभागाने रंग हात पकडले आहे.या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचे नाशिकमधील दामोदर चौक येथे कार्यालय असून,तिथे जी एस टी विभागाने कारवाई केली होती.या कारवाईचा तपास लवकर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात राज्यकर उप आयुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे यांनी तक्रारदाराकडे १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोड अंती ही रक्कम १ कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते.
दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांरी तत्काळ ताब्यात
तक्रारदाराने ‘मुंबई एसीबीकडे’ धाव घेत तक्रार नोंदविली होती. दिनांक ६ मार्च २०२६ रोजी ठरल्याप्रमाणे लाचेचा पहिला हफ्ता म्हणून २० लाख रुपये स्वीकारताना खाजगी मध्यस्थ इसम अमित हिरामण जाधव याला तक्रारदाराच्या कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले. त्यानंतर दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तत्काळ ताब्यात घेण्यात आले. आरोपी सोमनाथ पागे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता, तिथे अतिरिक्त २ लाख रुपयांची रोकड आढळून आली असून, ती जप्त करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
आरोपींचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू आहे. सदर कारवाई ला.प्र.वि. मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त विजय शंकर चव्हाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज या संशयितांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली असून अधिक तपास सुरू आहे.












