Child Kidnapping In Nashik | मागील काही दिवसांपासून राज्यात लहान मुलांच्या अपहरणाच्या (Child Kidnapping) घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. यामध्ये आता नाशिकमध्ये (Nashik) मुला-मुलींचं अपहरण केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये तीन मुलींचं अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – “नागपूर स्फोट प्रकरणाची सखोल चौकशी करा…”, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
वेगवेगळ्या भागांतून तीन मुलींचे अपहरण
नाशिकमधील वेगवेगळ्या भागांतून तीन मुलींचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरणाचा पहिला प्रकार नाशिकमधील अंबड परिसरात घडला. एक लहान मुलगी पांडव लेण्याजवळ होती, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने मुलीला काही आमिष दाखवत फूस लावून तिला पळवून नेत अपहरण केले. तर दुसरा प्रकार हा श्रमिकनगरमध्ये घडला. मोठी बहिण कामावर गेल्यानंतर छोट्या बहिणीला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण करण्यात आले.
अपहरणाचा तिसरा प्रकार हा पाथर्डी फाटा येथे घडला. एका लहान मुलीला तिच्या घराजवळ जात कशाचे तरी आमिष दाखवून तिला पळवून नेत तिचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, या तिन्ही अपहरण सत्रांनी संपूर्ण नाशिक शहराला हादरवून सोडले आहे. तसेच या प्रकरणाबाबत पोलीस कसून तपास करत असून तीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.












