AIIMS Nagpur Student Suicide : नागपूर येथे एका मेडिकल सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी समृद्धी पांडे हिने आत्महत्या केली आहे. मृत समृद्धी ही नागरपूर येथील त्वचा रोग शाखेत वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
बुधवारी समृद्धीने आत्महत्या केल्याचे समोर आले. तिने स्वतःच्या ओढणीने सिलिंग फॅनला घळफास घेऊन तिचे आयुष्य संपवले. तिची मैत्रीण सकाळच्या सुमारास कॉलेजला गेली असता या घटनेची माहिती मिळाली. तिने आत्महत्या का केली असावी हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावर अनेक अंदाज लागवण्यात येत आहे. त्यानुसार अकॅडमिक तणावामुळे तीने आत्महत्या केल्याचे बोलण्यात येत आहे. परंतु एम्सच्या सूत्रांनी त्वचा रोगाची (डर्माटोलॉजी) विद्यार्थिनी असल्याने तिला अकॅडमिक स्ट्रेस असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु नेमकं खरं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे.
डर्माटोलॉजीमध्ये फक्त 9 ते 5 काम असते. अन्य शाखांना असते त्यासारखे काम नसते. त्यामुळे, सायंकाळी किंवा रात्री थांबण्याचा किंवा वर्क रिलेटेड स्ट्रेस उद्भवण्याचा प्रश्नच नसतो. मृत समृद्धीने आत्महत्या का केली याचा तपस पोलीस लगावत असून नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तिच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत AIIMS नागपूरकडून बोलण्यास नकार देण्यात आला आहे. समृद्धी पांडे ही केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डीआयजी कृष्णकांत पांडे यांची मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे.
हा विषय पोलिसांच्या तपासणी अंतर्गत असल्याने आम्ही काही बोलू शकणार नाही, सदर मुलगी एम्स नागपूर येथे येऊन फक्त दोन किंवा तीनच महिने झाले होते, आम्हा सर्वांनाच या घटनेने धक्का बसला असुन दुःख झाले आहे असल्याचे एम्स नागपूरच्या एका सूत्राने सांगितले. याशिवाय एम्स नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी काऊन्सिलिंग सतत सुरू असते. या घटनेचा तपास पोलीस करत आहे, असे एम्सच्या सूत्रांनी सांगितले. (AIIMS Nagpur Student Suicide)












