Badlapur crime update : बदलापूर जिल्ह्यात शाळकरी लहान मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. फक्त 4 वर्षाच्या मुलीसोबत हा प्रकार घडला असून यामुळे बदलापूर याठिकाणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी देखील अशी घटना घडली होती. दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने संतप्त वातावरण याठिकाणी बघायला मिळत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
बदलापूर पश्चिमेकडील नामांकित एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला अटक करत गुन्हा दाखल
सुरुवातीला मुलीच्या आईवडिलांनी शाळेत तपास केला असता मुख्याधापिकेने बस चालकाची बाजू घेतली होती. यापूर्वी देखील झालेल्या अशा प्रकरणावर देखील शाळेतील प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि दुसऱ्यांदा देखील लैगिक अत्याचाराचा प्रकार घडल्यामुळे आणि शाळेच्या मुख्याधापिकेने पुन्हा दाद न दिल्याने पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. आणि पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
नर्सरीमध्ये शिकत होती मुलगी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या लहान मुलीवर वाहन चालकाने लैगिक अत्याचार केला ती मुलगी नर्सरीमध्ये शिकत होती. जेव्हा आई वाडीकलना घडलेला प्रकार समजल्यावर ते मुलीला शाळेत मुख्याद्यापिकेकडे गेल्यावर बस वाहनचालकाला देखील शाळेत बोलवून घेण्यात आले. जसा वाहन चालक मुख्याद्यापकांच्या केबिनमध्ये घुसला तशी चार वर्षाची चिमुरडी घाबरून आईच्या मागे लपली. यावरून आईवडिलांना मुलीच्या मनस्थितीची अंदाज आल्याने त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले.
फॉरेन्सिक टीम हजर
राज्य सरकारने बसमध्ये महिला अटेंडेंट ठेवण्याचे निर्देश दिले होते. तरीही शाळेच्या बस मध्ये महिला अटेंडेंट ठेवण्यात आला नाही. त्यामुळे स्थानिकांकडून बस चालकासह शाळेवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे. याशिवाय हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम हजर झाली होती. या टीमने स्कुल बसची तपासणी केली असून पुरावे गोळा केले आहे.
शाळेची बस चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी उपलब्ध नसल्याची माहिती
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, बस चालक जी स्कुल बस चालवत होता त्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासावेळी स्कुल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बसवर कारवाई केली आहे. तर आरटीओने व्हॅनचा परवाना रद्द केला असून 24 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.












