Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पिंपळनेर तिहेरी हत्याकांड; पीडित कुटुंबांना मदत व नोकरीसाठी साक्रीत हजारोंचा मोर्चा
Top News

पिंपळनेर तिहेरी हत्याकांड; पीडित कुटुंबांना मदत व नोकरीसाठी साक्रीत हजारोंचा मोर्चा

Financial assistance to families

Pimpalner triple murder case : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे लग्नसमारंभात साक्री येथील तिघांची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर साक्री शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी तसेच कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी आज हजारोंच्या संख्येने नागरिकांनी एकजूट दाखवत साक्री तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

हेही वाचा – डोंबिवलीत धक्कादायक प्रकार! नामांकित डॉक्टरचे नर्सशी प्रेमसंबंध, १० बियर अन् ४५ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

19 फेब्रुवारी रोजी साक्री येथील तीन युवक पिंपळनेर येथे लग्नसमारंभासाठी गेले असता, सोनगड येथील काही युवकांनी देवेंद्र पवार, सुनील गिरी आणि साहिल गिरी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेत कोणताही संबंध नसताना देवेंद्र पवार यांचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

घरातील कर्ता पुरुष गमावल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ

या दुर्दैवी घटनेमुळे साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. पीडित कुटुंबांनी पुढील आयुष्य कसे जगायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या स्तरावरून तात्काळ आर्थिक मदतीची घोषणा करावी आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. साक्री येथील अप्पर तहसीलदार पेंढारकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts