Delhi woman doctor rape case : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॉक्टर महिलेचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आता दिल्लीमध्ये देखील एका महिला डॉक्टरची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील आरोपीने महिलेचे शारीरिक शोषण, बलात्कार झाल्याची माहिती समोर आली असून महाराष्ट्रासह दिल्ली देखील हादरली आहे.
दिल्ली येथील छतपूर परिसरात राहणाऱ्या तरुणाने स्वतःला भारतीय सैन्यात लेफ्टनंट असल्याचे सांगत महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही डॉक्टर महिला सफदरजंग रुग्णालयात काम करत होती. या प्रकरणातील आरोपी डिलिव्हरी बॉय चे काम करतो. परंतु त्याने स्वतःला भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंट सांगत डॉक्टर महिलेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
या महिला डॉक्टरची आणि या आरोपीची ओळख एका इंस्टाग्रामवर झाली होती. त्यांनतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे व्हाट्सअप नंबर घेतले. या आरोपीने स्वतः सैन्यात लेफ्टनंट असून त्याची पोस्टिंग काश्मीर मध्ये असल्याची खोटी माहिती महिवाल डॉक्टरला दिली होती. तसेच भारतीय सैन्याचा युनिफॉर्म घातलेला फोटो देखील महिलेला पाठविण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. भेटीदरम्यान त्याने महिलेच्या अन्नात नशेचे औषध टाकले होते. त्यामुळे महिवाल डॉक्टर बेशुद्ध पडली. आणि याचा गैरफायदा घेऊन या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तिने 16 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर कारवाई करत आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर महिला डॉक्टरच्या पायाखालची जमीनच हादरली. या आरोपीने एका दुकानातून ऑनलाईन सैन्याची वर्दी खरेदी केली होती. त्यानंतर त्याने वर्दीतील फोटो डॉक्टर महिलेला शेअर केला होता. या चौकशी दरम्यान त्याने डिलिव्हरी बॉय असल्याचे देखील मान्य केले.
काय आहे साताऱ्यातील प्रकरण (Delhi woman doctor rape case)
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात महिला डॉक्टरवर 4 वेळा बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत महिलेने पोलीस निरीक्षक गोपाळ बदने याने वारंवार अत्याचार केल्याच्या आशयाची सुसाईड नोट हातावर लिहून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता दिल्ली मध्ये देखील असेच प्रकरण घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.












