The answer will be recorded : पुण्याच्या इंदापुरातील भिगवण मध्ये 17 फेब्रुवारी 21 वर्षे तरुणीचा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर संपूर्ण भिगवण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यावेळी हिंदू जन आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या जन आंदोलन उभरून सभा देखील झाली. त्याचवेळी प्रसार माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, यावर पडळकर आणि जगताप यांनी अक्षेप नोंदवला होता. मात्र, आता या घटनेतील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अपहरण करणारा तरुण आणि ज्या मुलीचे अपहरण झाले ते दोघेही पोलीसांत हजर झाले आहेत. आज या दोघांचा न्यायालयात जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती समोर आलीय.
हेही वाचा – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल 28 पूर्वी येणार; VRS कंपनीची तपासणी पूर्ण
रात्री दीड वाजता अखेर 50 तासाच्या नंतर अपहरण झालेली तरुणी आणि मुलगा बारामती पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये मुलीने एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे यामध्ये मुलगी म्हणत आहे मी माझ्या मर्जीने झहीर शेख सोबत आलीये, असा दावा तिने केल्याने आता याबाबत परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची धास्ती तरुणीच्या आईने मोठ्या प्रमाणात घेतली असून तरुणीच्या आई गेले एक-दोन दिवसापासून भिगवण येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मुलगी बारामतीमध्ये आल्याची माहिती मिळताच आज तिची आई बारामतीच्या दिशेने मुलीला भेटण्यासाठी रवाना झालीये. यावर नातेवाईक काय म्हणतात मुलीला ताब्यात घेणार की नाही. मुलगी त्यांच्यासोबत जाणार की नाही हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिस मुलगी आणि आरोपी मुलाचा न्यायालयासमोर जबाब गेणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाला कोणत्या प्रकरणचे वळण मिळतंय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.











