Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • गुन्हा
  • माणुसकीला काळिंबा! कोल्हापुरात प्रियकरानेच रचला कट; मित्रांसह तरुणीवर अत्याचार, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग
Top News

माणुसकीला काळिंबा! कोल्हापुरात प्रियकरानेच रचला कट; मित्रांसह तरुणीवर अत्याचार, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग

kolhapur

Kolhapur Crime: कोल्हापुरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीवर तिच्या प्रियकरासह चौघांनी अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. अश्लील व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊया.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडलीस आली असून, एका महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या प्रियकरासह चार जणांनी लैगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ आणि फोटो दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीचा दीर्घकाळ छळ करण्यात आला.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या दोन एसटी बसांची गुजरातमध्ये भीषण धडक; ७ ठार, ४१ जखमी, अपघाताचे कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांचा चार दिवसांची पोलीसकोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजीत मुधोळकर यांचा समावेश आहे. यापैकी एक आरोपी हा पीडित तरुणीचा प्रियकर असल्याचेही समोर आले आहे.

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी आदित्य शेटके याने सुरुवातीला तरुणीचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले. त्यानंतर या व्हिडिओंचा आधार घेत तिला ब्लॅकमेल करण्यात आले. पुढे त्याने आपल्या इतर मित्रांशी संपर्क साधण्यास भाग पाडले आणि या चौघांनी मिळून अनेक महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

मागील सुमारे दहा महिन्यांपासून पंडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन धमकावून अत्याचार करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्य शेटके हा फोटोग्राफी व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती असून, त्याच व्यवसायाच्या निमित्ताने पीडित तरुणीची त्याच्याशी ओळख झाली होती. नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, मात्र त्याचाच गैरफायदा घेत आरोपीने तिचे व्हिडिओ तयार करून तिला जाळ्यात अडकवले.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts