Breaking News :
राशी भविष्य

आज संकष्टी चतुर्थी! या 3 राशींवर गणरायाची विशेष कृपा; वाचा चंद्रोदय वेळ आणि पूजा विधी

Sankashti Chaturthi 2026

Sankashti Chaturthi 2026: आज संकष्टी चतुर्थी निमित्त भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे अधिक मासात आलेली ही संकष्टी अत्यंत फलदायी मानली जाते. सुमारे तीन वर्षांनी येणाऱ्या या दुर्मिळ योगामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढले आहे.

वैदिक मान्यतेनुसार, अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या चतुर्थीला “विभुवन संकष्टी” (Vibhuvan Sankashti ) असे म्हटले जाते. या दिवशी भगवान गणेश यांची उपासना केल्यास संकटे दूर होतात आणि जीवनात सुख- समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.

हेही वाचा: माणुसकीला काळिंबा! कोल्हापुरात प्रियकरानेच रचला कट; मित्रांसह तरुणीवर अत्याचार, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग

आजचा विशेष योग का मानला जातो?

अधिक मासात येणारी संकष्टी ही अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी केलेली व्रत, जप आणि पूजन सामान्य दिवसांपेक्षा अधिक फळ देणारे मानले जाते. त्यामुळे गणेश भक्तांसाठी हा दिवस खास ठरतो.

मुहूर्त आणि चंद्रोदय

चतुर्थी तिथी प्रारंभ: 2 जून रात्री 8:45 नंतर

चतुर्थी तिथी समाप्त: 3 जून रात्री 10:10 पर्यंत

सकाळी पूजा मुहूर्त: 7:15 ते 10:30

सायंकाळी पूजा व कथा: 6:30 ते 8:15

चंद्रोदय वेळ: रात्री 9:52

या दिवशी व्रत चंद्रदर्शनानंतर सोडले जाते. चंद्राला अर्घ्य अर्पण करून गणपतीची आरती केल्यावर व्रत पूर्ण मानले जाते.

या 3 राशींना विशेष लाभ

मेष

आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. कामात प्रगती आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण सुधारेल.

सिंह

मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात मोठे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे.

तूळ

आर्थिक बाबतीत लाभ होईल. नवीन करार किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

संकष्टी चतुर्थी पूजा विधी

सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे
गणपतीसमोर व्रताचा संकल्प करावा
लाल वस्त्रावर गणपतीची मूर्ती/फोटो स्थापित करावा
हळद, कुंकू, फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात
“ॐ गं गणपतये नमः” मंत्राचा जप करावा
मोदक किंवा गोड नैवेद्य अर्पण करावा
सायंकाळी कथा ऐकावी
चंद्रदर्शनानंतर अर्घ्य देऊन व्रत सोडावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts