Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • कर्जासाठी भयंकर कट! मित्राची हत्या, अन् स्वतःच्या मृत्यूचा बनाव
गुन्हा

कर्जासाठी भयंकर कट! मित्राची हत्या, अन् स्वतःच्या मृत्यूचा बनाव

friend murdered for loan scam

friend murdered for loan scam : गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia Crime News) आमगाव तालुक्यात एका तरुणाला बँकेचं कर्ज (Bank Loan) फेडता येत नसल्यानं एका तरुणानं स्वतःचा मृत्यू (Faking one’s own death) झाल्याचं भासवून घेण्यासाठी आपल्या मित्राची हत्या केली. त्याच्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घालून ओळख पटवून घेण्यासाठी त्याच्या खिश्यात आपलं आधार कार्ड आणि पर्स ठेवत मृतदेहाला आमगाव तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा रेल्वे रुळावर ठेवत रेल्वे गाडीच्या धडकेत आपला मृत्यू झाल्याचं नाटक (Staging one’s own death) घडवून आणलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अंतिम खोटेले याला तब्ब्ल ८ महिन्यानंतर नागपुरातून अटक (Arrested from Nagpur) केली आहे.

हेही वाचा – लॉज मध्ये आढळला महिलेचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील अंतिम ओमप्रकाश खोटेले याने पोल्ट्री फॉर्म व्यवसायासाठी ५ लाखांचे कर्ज बँकेतून घेतलं होतं. तर कर्जाच्या वाढत्या तणावातून सुटका मिळवण्यासाठी त्याने थेट स्वतःच्या मृत्यूचाच कट रचला. आणि आरोपीने गावातीलच 43 वर्षीय चंद्रकुमार सराटे याला दारू पाजून त्याचा गळा आवळून हत्या करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर नेवून टाकला. इतक्यावरच आरोपी थांबला नाही, तर मृतदेहाला स्वतःचे कपडे घातले आणि त्याच्या खिश्यात स्वतःचं आधारकार्ड आणि इतर कागदपत्रं ठेवून रेल्वे अपघातात स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला.

रेल्वे गाडीच्या धडकेत कापलेल्या अवस्थेत मृतदेह

दुसऱ्या दिवशी गावाजवळून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळाजवळ अंतिम खोटोले या तरुणाची दुचाकी दिसून आली तर काही अंतरावर रेल्वे गाडीच्या धडकेत कापलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला तर मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि त्याची गाडी आणि पायातील चपले पाहता हा मृतदेह अंतिम खोटेले या तरुणाचा असल्याचं लोकांना समजून येत्याच मृतदेहाची ओळख पटवून घेत चंद्रकुमार सराटे याचा मृतदेह हाच अंतिम खोटेले या तरुनाचा मृतदेह असल्याचं समजून घेत कुटूंबियांनी चंद्रकुमार सराटेचा मृतदेह स्वतःच्या घरी नेत खोटेले कुटूंबियांनी त्याच्यावर अंत्य संस्कार केले.

वडिलांच्या मोबाईलवर फोन करून स्वतः जिवंत असल्याचं सांगितले

तब्ब्ल ८ महिण्यानंतर बॅंकचं कर्ज माफ झाल्याचं अंतिमच्या लक्षात येताच अंतिम खोटेले या तरुणाने आपल्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करीत स्वतः जिवंत असल्याचं वडिलाना सांगितल्याने आमगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला. आणि अंतिम खोटेले या तरुणांना नागपूरातून अटक केली आहे. मृतक चंद्रकुमार सराटे याच्या घराजवळ आरोपी अंतिम खोटेले याचं दुकान असल्याने दोघांमध्ये चांगली ओळख निर्माण झाली आणि आरोपी अंतिम खोटेले याने याच गोष्टीचा फायदा घेत मित्राच्या हतेचा कट रचून कर्जातून सुटका मिळवण्यासाठी हे कृत्य घडवून आणल्याची कबुली दिली आहे.

मृत्याच्या कुटुंबियांची सीबीाय चौकशी करण्याची मागणी

चंद्रकुमारच्या कुटूंबियाणी आमच्या भावाची हत्या ही अंतिमने एकट्याने केली नसून यात आणखी आरोपी आहेत, असा आरोप करीत सीबीआय चौकशीची मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. तर या संदर्भात पोलिसांनी आरोपीला घटना स्थळावर घेऊन जातं कश्या पद्धतीने हत्या केली याची माहिती जाणून घेतली. त्यामुळे गुन्हा कोणताही असो तो एक ना एक दिवशी उघड येतो हेच आमगाव पोलिसांनी सिद्ध करून दाखविले.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts