Delhi Crime | राजधानी दिल्लीत (Delhi) एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील एका महाविद्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात (Firing) एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं दिल्लीत एकच खळबळ उडाली असून संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीत नेमकं घडलं काय?
दिल्लीत मंगळवारी (19 मे) रात्री एका कॉलेजजवळ एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीच्या श्यामलाल कॉलेजजवळ घडली. पोलिसांनी बुधवारी मृताची ओळख अमानुल्ला कुरेशी, रा. मौजपूर, अशी पटवली आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलीस आणि विशेष तपास पथकाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
काल रात्री दिल्लीच्या वेलकम परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक केशव चौक परिसरातील श्यामलाल कॉलेजजवळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना आढळून आले की, मौजपूर येथील गुरुद्वारा मोहल्ला येथे राहणाऱ्या मोहम्मद तस्लीम यांचा मुलगा अमानुल्ला कुरेशी (वय 22) याला गोळी लागली होती. जखमी अमानुल्ला याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
#WATCH | Delhi | An incident of murder has been reported near the Keshav Chowk within the jurisdiction of the Welcome Police Station area. Police and FSL teams are at the spot. More details are awaited. pic.twitter.com/d1x4EnkaSp
— ANI (@ANI) May 20, 2026
दरम्यान, अमानुल्ला याच्यावर नेमका कोणी गोळीबार केला आणि कोणत्या कारणामुळे केला याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी वेलकम पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.












