• Home
  • देश
  • “माझ्या मित्रा रोममध्ये आपले स्वागत आहे…”, म्हणत मेलोनींनी केलं पंतप्रधान मोदींचं खास स्वागत, दोघांच्या नवीन सेल्फीने वेधलं लक्ष
Top News

“माझ्या मित्रा रोममध्ये आपले स्वागत आहे…”, म्हणत मेलोनींनी केलं पंतप्रधान मोदींचं खास स्वागत, दोघांच्या नवीन सेल्फीने वेधलं लक्ष

modi meloni

PM Narendra Modi In Italy | सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज (20 मे) ते त्यांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी इटलीमध्ये (Italy) दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी इटलीमध्ये दाखल होताच त्यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिय मेलोनी (PM Giorgia Meloni) यांनी खास अंदाजात स्वागत केले. तसेच दोघांनी मिळून एक खास सेल्फी देखील काढला ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – “अमेरिका आज इराणवर हल्ला करणार…”, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक वक्तव्य, तणाव आणखी वाढणार?

पंतप्रधान मोदींचं इटलीत स्वागत करत जॉर्जिया मेलोनींनी केली खास पोस्ट

पंतप्रधान मोजी जेव्हा इटलीमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रोम विमानतळावर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी उपस्थित होत्या. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करत त्यांच्यासोबत एक सेल्फी काढला. तसेच तो सेल्फी मेलोनी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत “माझ्या मित्रा, रोममध्ये आपले स्वागत आहे” अशी खास पोस्ट त्यांनी केली आहे.

रोममधील भारतीय समुदायाने देखील पंतप्रधान मोदींचे हॉटेलमध्ये आगमन होताच भव्य स्वागत केले. मोठ्या संख्येने भारतीय तिरंगा घेऊन हॉटेलमध्ये दाखल झाले होते. यावेळी संपूर्ण हॉटेल ‘मोदी, मोदी…’ च्या घोषणांनी दुमदुमले होते. पंतप्रधान मोदींनी लोकांचे आपुलकीने स्वागत केले, त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि मुलांसाठी स्वाक्षरी केली. या सोहळ्यादरम्यान भारतीय आणि इटालियन कलाकारांनी पारंपरिक नृत्य आणि शास्त्रीय संगीत सादर केले, ज्याचा पंतप्रधान मोदींनी मनसोक्त आनंद घेतला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

इटलीत पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितले की, “मी इटलीतील रोम शहरात दाखल झालो आहे. मी राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. या भेटीचा मुख्य उद्देश भारत-इटली सहकार्याला चालना देणे हा असून, त्यात भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर (IMEC) विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. संयुक्त धोरणात्मक कृती योजना 2025-2029 चा आढावा देखील घेतला जाईल. मी अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) मुख्यालयालाही भेट देईन आणि बहुपक्षीयता तसेच जागतिक अन्न सुरक्षेसाठी भारताची वचनबद्धता अधिक दृढ करेन.”

दरम्यान, आज पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची भेट होणार असून, दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC) वर चर्चा होईल. हा केवळ एक व्यापारी मार्ग नाही, तर एक रेशीम मार्ग आहे जो भारत, मध्य पूर्व आणि युरोप यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करेल. या कॉरिडॉरमध्ये रेल्वे, रस्ते, ऊर्जा वाहिन्या आणि समुद्राखालील डिजिटल केबल्स यांचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts