• Home
  • महाराष्ट्र
  • विठ्ठल मंदिर परिसरात बेशिस्तीचा प्रकार; कृष्णराज महाडिक दौरा चर्चेत
महाराष्ट्र

विठ्ठल मंदिर परिसरात बेशिस्तीचा प्रकार; कृष्णराज महाडिक दौरा चर्चेत

Vitthal Mandir Pandharpur

Krishnaraj Mahadik Visit Vitthal Mandir Pandharpur: भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान विठ्ठल मंदिर परिसरात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनाच्या वेळी काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याने संपूर्ण प्रकाराला बेशिस्त वर्तनाचे गोलबोट लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अधिक मासामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आधीच मोठी गर्दी होती. अशा परिस्थितीत कृष्णराज महाडिक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले असता त्यांच्या सोबत आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हीआयपी प्रवेशासाठी गर्दी केल्याचे सांगितले जाते. यावेळी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: पार्थ, रोहित, तटकरेंच्या फडणवीस भेटींची चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे?

दौऱ्यादरम्यानचा कार्यक्रम

कृष्णराज महाडिक यांनी याआधी सोलापूर आणि बार्शी परिसरात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर ते पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आले होते. मात्र मंदिर परिसरातील गोंधळामुळे त्यांचा हा दौरा चर्चेत आला आहे.

भाविकांकडून नाराजी व्यक्त

मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाविकांनी नाराजी व्यक्त केली. धार्मिक स्थळी शिस्त राखली जावी, अशी अपेक्षा असताना अशा प्रकारचे वर्तन झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

राजकीय चर्चाना उधाण

या घटनेनंतर कृष्णराज महाडिक यांच्या पहिल्याच दौऱ्यावर वादाचे सावट निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळे संपूर्ण प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts