• Home
  • महाराष्ट्र
  • मिशन डायव्हर्टचा आरोप! नवनाथ बन विरुद्ध विवेकानंद पाटील; रामरक्षेच्या आव्हानाने वाद पेटला
राजकारण

मिशन डायव्हर्टचा आरोप! नवनाथ बन विरुद्ध विवेकानंद पाटील; रामरक्षेच्या आव्हानाने वाद पेटला

Navnath Ban vs Vivekanand Patil
Navnath Ban vs Vivekanand Patil : महाराष्ट्रात सध्या एक भयानक पॅटर्न जन्माला आलाय. या पॅटर्नचं नाव आहे, मिशन डायव्हर्ट…. म्हणजेच… मूळ मुद्द्याला बगल देणे, विषय भरकटवणे, पुण्यात विद्यार्थ्यांसाठी लढणारे विवेकानंद पाटील आणि भाजपचे प्रवक्ते यांच्यामध्ये शाब्दिक वार सुरु झालंय… नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय म्हटलं , दारू आणि मुलींचा विषय काढला. विवेकानंद यांच्यावर टीका केली, त्या टीकेला विवेकानंद यांनी जबरदस्त उत्तर दिल्यावर, नवनाथ बन यांनी थेट रामरक्षा आणि धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला. प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा होता, पण बन यांनी तो ‘नवनाथ बन विरुद्ध विवेकानंद पाटील’ असा वैयक्तिक आणून सोडलाय….

पुण्यातील MPSC विद्यार्थी आंदोलनावर नवनाथ बन यांनी काय आरोप केले?

नवनाथ बन यांनी रोहित पवारांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाला थेट राजकीय ठरवून टाकलं. त्यांनी आरोप केला की, हे आंदोलन विद्यार्थ्यांचं नाहीच, तर यामागे आमदार रोहित पवार आणि विरोधकांचा कट आहे. पण प्रश्न हा निर्माण होतो की, जर आंदोलनामागे राजकारण असेल, तर मग रस्त्यावर बसलेले ते हजारो सामान्य विद्यार्थी कोण आहेत? ते भाडोत्री आहेत का? नवनाथ बन यांच्या या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. आणि इथूनच सुरू झाला बन विरुद्ध विवेकानंद हा सामना…..

यावरती नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांच्यावर गंभीर टीका केलीये…. माझं नाव नवनाथ आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी नाथ परंपरा ही भागवत धर्मापर्यंत आणून जोडली आहे, हे या उकीरडा बुद्धीच्या लोकांना काय माहिती? मी विवेकानंद पाटील ( Vivekanand Patil )  आणि रोहित पवार यांना आव्हान देतो… त्यांनी किमान पुस्तकात पाहून तरी ‘रामरक्षा’ किंवा भगवद्गीतेचे श्लोक वाचून दाखवावेत. ५०० मार्कांचा पेपर घ्यायला मी तयार आहे. जर यांच्यात हिंमत असेल, तर वारकरी संप्रदायाचा एखादा सोपा अभंग तरी म्हणून दाखवावा. नाव विवेकानंद ठेवून कोणी विवेकी होत नाही, अशी टीका नवनाथ बन यांनी केलीये…

हेही वाचा : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नवं वळण; तिघांनी उपोषण सोडलं, नेमकं कारण काय? 

रामरक्षा आणि वारकरी अभंगाच्या आव्हानामुळे वाद कसा वाढला?

या संपूर्ण प्रकरणात दोन व्यक्तींमधील वाद आता अत्यंत खालच्या पातळीवर गेला आहे. एकीकडे आंदोलनाचे नेतृत्व करणारे विवेकानंद पाटील आहेत, जे विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरताना बन यांच्यावर उकीरडा बुद्धीचा माणूस अशी बोचरी टीका करतात. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन आहेत, जे या टीकेला उत्तर देताना गाढवाला उकीरडाच आवडतो अशा शब्दांत प्रत्युत्तर देतात. पत्रकार परिषदेत भावनिक कार्ड खेळताना नवनाथ बन यांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिक आजोबांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या आजोबांनी निजामाविरुद्ध लढा दिला आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे घर विकले.

Navnath Ban : तुमच्या आजोबांनी निजामाविरुद्ध लढा दिला, कारण तेव्हा हक्काची लढाई होती. आजचा विद्यार्थी सरकारविरुद्ध लढा देतोय, कारण आज त्याच्या भविष्याची लढाई आहे. मग आजच्या विद्यार्थ्याला राजकीय एजंट किंवा अधार्मिक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

नवनाथ बन यांनी रोहित pawar आणि विवेकानंद यांना रामरक्षा वाचण्याचं आवाहन केल्यानंतर रोहित पवारांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलंय कि मी नवनाथ बन यांना भिक घालत नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts