Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नवं वळण; तिघांनी उपोषण सोडलं, नेमकं कारण काय? रोहित पवारांनी केला खुलासा
Pune

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नवं वळण; तिघांनी उपोषण सोडलं, नेमकं कारण काय? रोहित पवारांनी केला खुलासा

MPSC Protest Pune
MPSC Protest Pune: पुण्यात गेल्या ९ दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनातील सात उपोषणकर्त्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण सोडण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत आमदार रोहित पवार यांनी माहिती (Rohit Pawar Statement) दिली आहे.

MPSC Protest Pune: पुण्यात गेल्या ९ दिवसांपासून ( Pune Latest News ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन (MPSC Students Hunger Strike) सुरू आहे. यात एक मोठे वळणं आले आहे. आंदोलनात अन्नत्याग करणाऱ्या सात विद्यार्थ्यांपैकी तिघांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती खालावण्याची शक्यता आणि किडनीवर विपरीत परिणाम होण्याचा धोका लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उर्वरित चार विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू असून आंदोलन मागे घेण्याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. ( MPSC News Today )

हेही वाचा: शुक्रवारचा दिवस कसा जाणार? ‘या’ राशींना मिळू शकते आनंदाची बातमी!

पुण्यातील MPSC आंदोलनाचा नववा दिवस

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला (MPSC Protest Latest News) शुक्रवारी नववा दिवस उजाडला. आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलनस्थळावरील वाहतूक आणि पूल रिकामा करण्याच्या सूचनांमुळे परिस्थिती अधिक चर्चेत आली आहे.

मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव तिघांनी उपोषण थांबवलं

आंदोलनात अन्नत्याग करणाऱ्या सात विद्यार्थ्यांपैकी ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके यांनी उपोषण सोडले आहे. दीर्घकाळ उपाशी राहिल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः किडनीच्या आरोग्याशी संबंधित धोका लक्षात घेऊन उपोषण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना प्रकृतीचा विचार करावे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी दूध पिऊन उपोषण सोडले. मात्र आंदोलनातील आणखी ४ उपोषणकर्ते अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती आहे.

रोहित पवारांची भूमिका काय?

रोहित पवार यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत तिघांनी उपोषण सोडल्याचे सांगितले. विराज शिंदे आणि आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत संबंधित विद्यार्थ्यांनी दूध घेऊन उपोषण थांबवले.

मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनाचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार कायम असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

हेही वाचा: मुंबईकरांनो, हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? मग ठाण्यातील ‘ही’ सुंदर ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा!

शिवराज मोरे यांचा सरकारला इशारा

दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनीही सरकारवर टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास अलका चौकात आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोरे यांनी केला. तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्लीतील राहुल गांधी यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा कधी?

MPSC आंदोलनात तीन विद्यार्थ्यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपोषण थांबवले असले, तरी उर्वरित आंदोलकांचा संघर्ष सुरूच आहे. सरकार आणि संबंधित आयोगाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts