Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • MPSC आंदोलन पुन्हा पेटणार? रोहित पवारांचा कांगणे सरांवरून निशाणा; 27 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन
राजकारण

MPSC आंदोलन पुन्हा पेटणार? रोहित पवारांचा कांगणे सरांवरून निशाणा; 27 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन

MPSC Protest Pune 2026
14

MPSC Protest Pune 2026 : MPSC चा पेपरफुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह इतर ठिकाणी आंदोलन सुरू केलं…यानंतर सरकारने विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावलं…काही विद्यार्थी आणि प्रसिद्ध शिक्षण विठ्ठल कांगणे सर सरकारच्या भेटीला गेले होते…सरकारने विद्यार्थ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आणि आंदोलन शांत झालं..पण चर्चेसाठी गेलेले विद्यार्थी आणि कांगणे सरांनी कोणत्या मागण्या मान्य झाल्या याबाबत माहिती दिली नाही…आणि त्यानंतर कांगणे सरांना ट्रोल करण्यात आलं..

रोहित पवारांनी देखील त्यांच्यावर नाव न घेता टीका केली…यानंतर आता आजही रोहित पवारांनी नाव न घेता कांगणे सरांवर टीका केली…मुख्यमंत्र्यांसोबत जे शिष्टमंडळचर्चेला गेले होते… त्यामध्ये क्लासवाले होते, फसवून त्यांना घेऊन गेलेच…सर्वच क्लासवाले चुकीचे नाहीत, असं रोहित पवारांनी म्हटलंय…नेमकं रोहित पवारांनी क्लासवाल्यांबाबात काय म्हटलंय पाहूयात…

MPSC पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचा आक्रोश पुन्हा वाढला ( MPSC Protest Pune 2026 )

या संपूर्ण संघर्षाची सुरुवात 7 सप्टेंबर रोजी पुण्यात झालेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व मोर्च्याने झाली होती…आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात शिक्षक विठ्ठल कांगणे सर यांनी प्रवेश केला आणि आपल्या नेहमीच्या खणखणीत शैलीत तुफान भाषण करत रस्त्यावर उतरलेल्या लाखो विद्यार्थ्यांचा जोश वाढवला… या तीव्र आंदोलनानंतर शासकीय पातळीवर प्रचंड खळबळ उडाली आणि सरकारने अखेर आंदोलनकर्त्यांना चर्चेचे अधिकृत आमंत्रण दिले… यानंतर घडलेल्या घडामोडींनी मात्र आंदोलनाची दिशाच बदलून टाकली… यशस्वी आंदोलनानंतर काही दिवसांतच विठ्ठल कांगणे सर काही मोजक्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले, असा आरोप आहे…. या तातडीने ठरलेल्या बैठकीनंतर बाहेर आल्यावर कांगणे सरांनी प्रसारमाध्यमांसमोर येत सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याचे सांगत तूर्तास आंदोलन शांत करण्याचे आवाहन केले…

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या हाय-प्रोफाईल बैठकीनंतर खऱ्या अर्थाने आंदोलनात संतापाची पहिली ठिणगी पडली. सरांनी लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा वापर करून सरकारसोबत छुपी सेटिंग केली आणि स्वतःच्या कोचिंग क्लासेसचे हित साध्य करण्यासाठी आंदोलनाचा बळी दिला, अशी टीका सोशल मीडियावर होऊ लागल्या… या तीव्र ट्रोलिंगच्या दरम्यान एका विद्यार्थ्याच्या कमेंटला उत्तर देताना कांगणे सरांकडून वादग्रस्त शब्दांचा वापर झाला, ज्यामुळे आगीत तेल ओतले गेले… परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर कांगणे सरांनी एक जाहीर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत संपूर्ण विद्यार्थ्यांची माफी मागितली. आपले ते वक्तव्य प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी नसून केवळ हेतूपूर्वक शिवीगाळ करणाऱ्या ट्रोलर्ससाठी होते आणि आपण मुख्यमंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांचीच बाजू मांडली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, या माफीनंतरही विद्यार्थ्यांमधील अविश्वासाची दरी मिटलेली नाही…

हेही वाचा : लालबागच्या राजाच्या चरणी ठेवलेली ₹500 ची नोट काही सेकंदांत गायब? व्हायरल VIDEO

रोहित पवारांचा कोचिंग क्लासेसच्या भूमिकेवर सवाल ( Vitthal Kangane Sir )

या संपूर्ण प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक पवित्रा घेतला असून विठ्ठल कांगणे सरांचे ( Vitthal Kangane Sir ) थेट नाव न घेता त्यांनी, कोचिंग क्लास चालवणाऱ्या व्यावसायिक लॉबीवर सडकून टीका केली…रोहित पवारांनी अत्यंत गंभीर आरोप करत सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी जे शिष्टमंडळ गेले होते, ते खऱ्या अर्थाने मैदानात लढणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी नव्हतेच. त्यामध्ये मोठे कोचिंग क्लासेस चालवणारे काही व्यावसायिक लोक होते…फसवून त्यांना घेऊन गेले होते, असा आरोप रोहित पवारांनी केला…

मागील भेटीत झालेल्या या फसवणुकीचा धडा घेत आमदार रोहित पवार आणि मुख्य विद्यार्थी संघटनांनी आता आंदोलनाची रणनीती पूर्णपणे बदलली आहे… पोलिसांनी आधी गणेशोत्सवाचे कारण देत आणि आता विसर्जन मिरवणुकांनंतरच्या बंदोबस्ताचा ताण पुढे करत 26 सप्टेंबर रोजी नियोजित असलेल्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे… आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले असून पुणे पोलीस जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे.. पुणे पोलिसांनी आंदोलनाला अजून परवानगी दिली नाही…27 तारखेला सकाळी 10 वाजता गरवारे रोडवर आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार…मात्र त्यापूर्वी सरकारला जर वाटलं तर, आमच्या 15 विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करू शकते असंही रोहित पवार म्हणाले…

MPSC चे विद्यार्थी आता 27 तारखेला रस्त्यावर उतरणार की त्यापूर्वी सरकार 15 विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करून मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे…तुम्हाला काय वाटतं, MPSC च्या पेपरफुटीनंतर अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे का?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts