Kharat 3 Crore Compensation : बळजबरी करून, धमकावून, भीती दाखवून नाशिकच्या भोंदू खरातनं (Ashok Kharat) लोकांच्या बळकावलेल्या जमिनींनी त्याला तुरूंगात असूनही मालामाल केलंय. या जमिनींनी त्याला पुन्हा एकदा कोट्यधीश बनवलंय, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. तुरुंगात असूनही खरातचं कुटुंब मालमाल (Kharat family strikes it rich) होणार असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं खरात तुरूंगात असून मालामाल झाला आहे.
हेही वाचा – साहेब, हप्ता देतो, पण गाडी सोडा; वाळूमाफियाचा व्हिडिओ व्हायरल
लैंगिक अत्याचार, बेकायदा जमीन व्यवहार आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी गेली दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भोंदू अशोक खरातला जॅकपॉट लागलाय. सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून त्याला तब्बल 3 कोटी रुपये मिळणार आहेत. रिंगरोडसाठी संपादित करावयाच्या क्षेत्रात खरात कुटुंबीयांची जमीन असून, त्यापोटी त्याच्या कुटूंबाला प्रचलित दरानुसार सुमारे तीन कोटी रुपये मोबदला मिळण्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना शासनदरबारी आवश्यक ती कागदपत्रे
जमा करावी लागणार आहेत.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कुंभमेळा रिंगरोड’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनात अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनी जात आहेत. प्रचलित दरानुसार त्या जमिनीचे मूल्य 3 कोटी असल्याच सांगण्यात येतंय. अर्थात, त्यासाठी ही जमीन आपलीच असून, ती कोणाकडूनही बळजबरीनं घेतली नसल्याचे पुरावे आता खरात कुटुंबीयांना सादर करावे लागणार आहेत.
खरातप्रकरणात निलंबित झालेले उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीचं नाव देखील या भूसंपादन प्रक्रियेत समोर आलंय. खरातच्या या जमीन व्यवहाराशी संबंधित प्रक्रियेत भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रूपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातच्या जमिनीत भांडे यांच्या पत्नीही सहभागीदार आहेत.
एकूणच काय, तर मरणाची भीती दाखवून, धमकावून, दरडावून खरातनं स्वतःच्याच भक्तांसह अनेकांना लुटलं, लुबाडलं आणि त्यातून अमाप स्थावर जंगम मालमत्ता पदरात पाडून घेतली. पण आता त्याला त्याचं उभं आयुष्य तुरूंगातच सडावं लागणार आहे. त्याला या धनलाभाचा काय फायदा? खरं तर शासनानं या जमिनींचा मोबदला त्याच्या घशात न घालता सरकारी तिजोरीत जमा करून त्यानं लुटलेल्या गोरगरीब लोकांना वाटून टाकावा म्हणजे खरा न्याय दिल्यासारखं वाटेल.












