Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • आधी अनैतिक संबंध अन् नंतर महिलेचे अपहरण करून…; काँग्रेस नेत्याच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?
Mumbai

आधी अनैतिक संबंध अन् नंतर महिलेचे अपहरण करून…; काँग्रेस नेत्याच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

koparkar

Suresh Koparkar | राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील भाडुंपमधील काँग्रसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर (Suresh Koparkar) आणि त्यांच्या पत्नी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका आशा कोपरकर (Asha Koparkar) यांच्यासह त्यांची मुलगी आणि जावई चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारण त्यांच्याविरोधात अपहरण आणि मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने भांडुप पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सुरेश कोपरकर यांच्यासोबत महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिचे अपहरण करत तिला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई आणि त्यांच्या खासगी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश कोपरकर यांचं एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. त्यामुळे या संशयातून संतापलेल्या आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला बेदम मारहाण करत तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरमी पीडितेने पोलीस स्थानकात संपूर्ण कोपरकर कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध कलमांखाली कोपरकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts