Breaking News :
Pune

लॉज मध्ये आढळला महिलेचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट

woman dead body found in lodge

woman dead body found in lodge : पुण्याच्या जुन्नर (Pune Crime News) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. जुन्नर तालुक्यातील ओतूर इथं एका लॉजमध्ये ३१ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death of a Woman) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ओतूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्नेहल अमोल शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून, त्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील रहिवासी होत्या. लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं अनेक तर्क-वितर्कांना उधाण (Speculation Runs Rampant) आलंय.

हेही वाचा – आधी अनैतिक संबंध अन् नंतर महिलेचे अपहरण करून…; काँग्रेस नेत्याच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील वाघिरे महाविद्यालयासमोर ‘अमृत लॉज’ आहे. याच लॉजमध्ये ३१ वर्षीय स्नेहल शिंदे या मयत अवस्थेत आढळून आल्या. लॉजच्या खोलीत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला. मात्र, तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केलं.

या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात? याबाबत ओतूर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, लॉजमधील रजिस्टरवरील नोंदी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून पोलीस पुढील तपासाची दिशा निश्चित करत आहेत.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या संशयास्पद मृत्यूमुळे ओतूर परिसरात सध्या चिंतेचं वातावरण असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts