Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • धाडीदरम्यान सापडला अफाट पैसा, उद्योगपतींनाही टाकलं मागं; बिहारच्या अभियंत्याचा मोठा कारनामा उघड
Top News

धाडीदरम्यान सापडला अफाट पैसा, उद्योगपतींनाही टाकलं मागं; बिहारच्या अभियंत्याचा मोठा कारनामा उघड

gopal kumar

Engineer Gopal Kumar Case | बिहारमध्ये (Bihar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिहारच्या एका अभियंत्याचा काळा कारनामा उघड झाला आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यातील झाझा ब्लॉकमधील ग्रामीण कार्य विभागाचे कार्यकारी अभियंता गोपाल कुमारच्या (Gopal Kumar) निवासस्थानी छापा (Raid) टाकण्यात आला होता. या धाडीदरम्यान अधिकाऱ्यांना एवढी संपत्ती सापडली की तेही चकीत झाले आहेत.

हेही वाचा – अनैतिक संबंध अन् नंतर महिलेचे अपहरण करून…; काँग्रेस नेत्याच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

अभियंता गोपाल कुमारने आपल्या ऐपतीपेक्षा कितीतरी जास्त संपत्ती जमवली असून, ती मोठ्या उद्योगपतींच्या संपत्तीलाही मागे टाकणारी आहे. 2008 मध्ये गोपाल कुमारने बिहार सरकारमध्ये कामाला सुरुवात केली होती. तर 2022 मध्ये त्याला कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळाली होती. तर याच सरकारी नोकरीचा गोपालने गैरफायदा घेण्यास सुरूवात केली आणि त्याने आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत अफाट संपत्ती जमवली.

आर्थिक गुन्हे शाखेने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, गोपाल कुमारने त्याच्या उत्पन्नापेक्षा ₹2,006,100 अधिक किमतीची मालमत्ता जमा केली असून, याचा पुरावा सापडला आहे. ही रक्कम गोपाल कुमारच्या उत्पन्नापेक्षा 81.5% अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय? बिहारच्या अभियंत्याकडे किती सापडली संपत्ती?

आर्थिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 16 मे रोजी गोपाल कुमारच्या चार ठिकाणांवर छापे टाकले. या झडतीदरम्यान त्यांना 47,00,000 रुपये किमतीच्या दागिन्यांच्या खरेदीशी संबंधित पावत्या, 39.65 दशलक्ष रुपये रोख रक्कम आणि 424.08 ग्रॅम सोन्या, चांदीचे दागिने सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. गोपाल कुमारकडे सापडलेली ही संपत्ती एवढी जास्त आहे की उद्योगपतींनाही मागं टाकलं आहे. ही संपत्ती पाहून अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

गोपाल कुमारकडे एवढीच संपत्ती सापडली नाही तर त्याचे सगुणा मोड येथील जेबी मॉलमध्ये सुमारे 70,00,000 रुपये किमतीची दोन व्यावसायिक दुकाने आहेत, दानापूर मार्केट कमिटीजवळ 1.25 कठ्ठ्याचा एक निवासी भूखंड ज्यावर इमारतीचे बांधकाम सुरू आहे, यांव्यतिरिक्त अतिरिक्त 93 लाख रुपये अधिकाऱ्यांना सापडले आहेत. तसेच झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना एक अलिशान कार आणि एक स्कूटरही सापडली आहे. तसेच त्याच्या निवासस्थानातून ग्रामीण बांधकाम विभागाशी संबंधित अनेक सरकारी कागदपत्रे, फाईल्स जप्त करण्यात आल्या असून, याची माहिती विभागाला देण्यात आली आहे. तसेच अद्यापही गोपाल कुमारच्या संपत्तीबाबत शोधमोहीम सुरू आहे.

गोपाल कुमारचे तीन बँक खात्यांमध्ये अंदाजे ₹1,000,000 जमा असल्याचे आढळून आले आहे. गोपालच्या या अफाट संपत्तीमुळे अधिकारीसुद्धा चकित झाले आहेत. कारण भ्रष्टाचाराशिवाय एकाच कामातून एवढी संपत्ती जमा करणे अशक्य आहे. त्यामुळे गोपाल कुमारने एवढी संपत्ती कशी जमवली याबाबत सध्या तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts