Breaking News :
  • Home
  • देश
  • LPG पुरवठ्याला वेग! ‘SYMI’ टँकर भारतात दाखल, एलपीजी संकट टळणार?
Top News

LPG पुरवठ्याला वेग! ‘SYMI’ टँकर भारतात दाखल, एलपीजी संकट टळणार?

symi

LPG Tanker Symi Arrives In Gujarat | मध्य पूर्वेतील तणावामुळे देशात पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि गॅसच्या (Gas) किंमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. या वाढत्या किंमतींमध्ये सर्वसामान्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. अशातच आता भारताला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. काल (16 मे) होर्मुझची सामुद्रधुनी (Hormuz Strait) पार करून एलपीजीने भरलेले दोन जहाज भारतात दाखल झाले आहेत. तर आजही एलपीजी (LPG) घेऊन भारताचे सीमी (SYMI) जहाज भारतात सुरक्षितरीत्या दाखल झाले आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – अखेर फॉर्म्युला ठरला! विजय सरकारमध्ये खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळालं कोणतं खातं?

‘सिमी’ एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी केली पार, गुजरातमध्ये झाले दाखल

आज सकाळी ‘सिमी’ नावाचा एलपीजी टँकर होर्मुझ सामुद्रधुनी पार करून गुजरातमधील कांडला बंदरात दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सिमी’ या एलपीजी वाहक जहाजावर 21 कर्मचारी आहेत. तर हे जहाज कतारच्या रास लाफान टर्मिनलवरून गॅस घेऊन निघाले होते आणि आज ते कांडला बंदरात पोहोचले आहे.

एकिकडे सिमी हे जहाज भारतात दाखल झाले आहे तर दुसरीकडे ‘एनव्ही सनशाईन’ या आणखी एका जहाजाने गुरुवारी (14 मे) सकाळी सुमारे 9:30 वाजता होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. तर हे जहाजही 18 मे पर्यंत नवीन मंगळुरू बंदरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतात एकामागून एक एलपीजी घेऊन येणार जहाज होर्मुझ सामुद्रधुनी पार करून सुरक्षितपणे दाखल होत असल्यामुळे आता गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी ‘सिमी’ नावाच्या एलपीजी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. तणाव कायम असतानाच एलपीजी टँकरची ही हालचाल झाली आहे. विशेष म्हणे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. असं असलं तरी आतापर्यंत एकूण 13 भारतीय जहाजे या मार्गावरून गेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts