• Home
  • देश
  • होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा, इराणसोबतचा करार अंतिम टप्प्यात
Top News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा, इराणसोबतचा करार अंतिम टप्प्यात

trump 9

Donald Trump | अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील तणाव कमी होणार असल्याची चिन्हं सध्या दिसत आहेत. तीन महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेने एक मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतच्या कराराबाबत मोठी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) खुली होण्याबाबतही मोठा दावा केला आहे.

हेही वाचा – पाकिस्तान हादरलं! क्वेटामध्ये रेल्वे रुळावर भीषण स्फोट; 20 जण गंभीर जखमी

होर्मुझ सामुद्रधुनीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केला दावा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे की, त्यांनी या करारासंदर्भात प्रदेशातील अनेक प्रमुख देशांच्या प्रमुखांसोबत फोनवर विस्तृत चर्चा केली. तसेच त्यांनी कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), पाकिस्तान, जॉर्डन, तुर्की, इजिप्त आणि बहरीनच्या नेत्यांसोबतही संवाद साधला आहे. तर ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, इराण आणि इतर देशांमधील वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. आता फक्त कराराला अंतिम स्वरूप देणे बाकी आहे. सोबतच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबतही संवाद साधल्याचं सांगितलं. “माझा नेतान्याहू यांच्यासोबत उत्तम संवाद झाला आहे. आम्ही अद्यापही कराराच्या अंतिम तपशिलावर चर्चा करत आहोत, जो लवकरच जगासमोर मांडला जाईल,” असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यानंतर लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे अनेक देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इराणनेही अमेरिकेसोबतच्या कराराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इराणने शनिवारी सांगितले की, ते अमेरिकेसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी ‘सामंजस्य करारा’वर काम करत आहे. त्यामुळे आता इराण आणि अमेरिकेतील तणाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts