Satara suicide case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. मृत तरूणीला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलने केली. मात्र, सरकारने या प्रकरणाला गांभिर्याने घेतले नाही. आता मात्र सरकारच्या अंगाशी आल्यामुळे ‘एसआयटी’ च्या स्थापनेचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. राज्याचे गृहमंत्री फडणवीसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना हे आदेश दिले आहेत. महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात यावी असे हे आदेश आहेत. त्यामुळे फलटण प्रकरणात महाराष्ट्र सरकार हे उशीरा सुचलेला शहाणपणा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
फलटण प्रकरणात पोलिसच आरोपी असल्याने पोलिसांच्या तपासावर आरोप होत असल्याने महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या हातात हा तपास देण्यात येणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता महिला अधिकारीच या प्रकरणाचा तपास करताना पाहायला मिळणार आहेत. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींवरही आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याही अटकेची मागणी होत असताना आता या एसआयटी पथकाच्या स्थापनेनंतर पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे ही वाचा – अमेरिकेकडून महाराष्ट्र पोलिसांना महत्त्वाचा मेल; कॉल सेंटर फसवणूक प्रकरणाच्या तपासाला वेग
एसआयटी रणजीत नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणणार आहे का?
देवेंद्रजींनी SIT नेमली याचं कौतुक करणाऱ्या पोस्टी चा रतीब पाठीचा कणा नसणारे त्यांचे दरबारी पाडत आहेत. हे उल्लेखनीय आहे की, इतके दिवस हे बोलघेवडे बिळामध्ये लपून बसले होते. आज अचानक कंठ फुटला आहे. पण जर कंठ फुटलाच आहे तर मग त्याच देवेंद्रजींना हाही प्रश्न विचारावा की जर आत्ता SIT नेमली, तर मग त्या आधीच रणजीत नाईक निंबाळकरांना क्लीनचीट देण्याची घाई का केली.? तुम्ही नेमलेली एसआयटी रणजीत नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणणार आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यानी उपस्थित केला आहे.
तीन तारखेला नुसतं येते म्हटलं की लगेच नेमली समिती…!!
देवेंद्रजींनी SIT नेमली याचं कौतुक करणाऱ्या पोस्टी चा रतीब पाठीचा कणा नसणारे त्यांचे दरबारी पाडत आहेत…
हे उल्लेखनीय आहे की, इतके दिवस हे बोलघेवडे बिळामध्ये लपून बसले होते. आज अचानक कंठ फुटला आहे.
पण जर कंठ फुटलाच आहे तर… pic.twitter.com/XB7JYNxMMr— SushmaTai Andhare (@andharesushama) October 31, 2025
डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाचीही तशीच मागणी
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्याची मागणी अनेक राजकीय नेते, पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती. डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाचीही तशीच मागणी होती. या मागणीतून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे हे प्रकरण सरकारच्या अंगाशी आल्यामुळे आता उशीरा सुचलेला हा शहाणपणा असल्याचे बोलले जात आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद (Satara suicide case)
या प्रकरणातले प्रमुख आरोपी प्रशांत बनकर व आयपीएस गोपाळ बदने या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. व त्यांची कस्टडीही न्यायालयाने पोलिसांना दिलेली आहे. सखोल तपास, व या दोन आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे सर्व तपशील तपासण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. ज्याला न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 5 दिवसांची कस्टडी दिली होती.
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावर आरोपींची नावे लिहित आत्महत्येसारखं पाऊल उचललं होतं. तिने यावेळी पीएसआय गोपाळ बदनेने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं म्हटलं होतं, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरने आपला मानसिक व शारिरीक छळ केल्याचं लिहिलं होतं.










