Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा; पुन्हा बुधवार पेठेत पाठवले
Pune

मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा; पुन्हा बुधवार पेठेत पाठवले

Police Outpost Exploitation Allegation

Police Outpost Exploitation Allegation : पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मदतीसाठी स्वतः पोलिस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्यावर झाला असून संबंधित महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, इंदापूरमधील एक हजार एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली.

पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये बोलणी

मात्र, मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे.

कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले.

पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांची कारवाई

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली असून, “अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावून शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली,” असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts