Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • चौथ्यांदा झाली मुलगी म्हणून निर्दयी पित्याने केली 3 दिवसाच्या बाळाची हत्या!
Top News

चौथ्यांदा झाली मुलगी म्हणून निर्दयी पित्याने केली 3 दिवसाच्या बाळाची हत्या!

Police investigation underway in a case where a father allegedly killed his three-day-old newborn baby girl

father kills newborn baby girl : जळगाव जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. भारतात मुलगा हवा म्हणून अनेक जण चुकीचे पाऊल उचलतात. तर बऱ्याचदा मुलगा हवा या हट्टामुळे मुलींना मारून टाकण्याच्या घटना घडतात. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. मुलगा हवा या विकृत मानसिकतेतून एका पाषाणहृदयी बापाने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यात घडला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा लालचंद राठोड या नराधमाला आधीच तीन मुली असताना चौथ्यांदाही मुलगीच झाल्यामुळे तो संतप्त होता. अशातच १३ नोव्हेंबर रोजी त्याला पुन्हा चौथी मुलगी झाली. त्यामुळे त्याने त्याची नवजात मुलगी राधिकेच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून तिचा जीव घेतला. त्यानंतर सुरुवातीला हा अपघाती मृत्यूचा बनाव त्याने केला मात्र शवविच्छेदन अहवालात टणक वस्तूच्या मारामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

हे ही वाचा : तरुणांच्या आरोग्याशी खेळ; नकली दारू तयार करून सर्रास विक्री

पोलीस करत असलेल्या तपासात आरोपी बापाने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पहूर पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी त्याला अटक केली. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या घोषणा केवळ फलकांपुरत्याच राहिल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, मुलाच्या हव्यासाने समाज किती क्रूर होऊ शकतो, याचा भयावह चेहरा उघड झाला आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts