Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • बँकेच्या वसूली एजंटला पोत्यात बांधून जिवंत जाळलं, लातुरात थरारक हत्याकांड
Top News

बँकेच्या वसूली एजंटला पोत्यात बांधून जिवंत जाळलं, लातुरात थरारक हत्याकांड

Latur Bank agent murder

Latur bank agent murder : शनिवारी मध्यरात्री औसा पोलीस स्टेशनला १२२ नंबर वर एक फोन येतो. तिकडून कोण तरी या थराराक हत्याकांडाची माहिती देत होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना लांबूनच एक आग लागलेली गाडी दिसली. त्यानी लगेच अग्निशमन दलाला माहिती कळवली. आणि आजूबाजूला काही मिळतंय का याचा तपास सुरू केला. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर तपासादरम्यान, गाडीत एक मृतदेह आढळला, जो पूर्णपणे जळालेला होता. फोरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आलं होत.

हेही वाचा – चक्क शासकीय वाहन केले चोरी; २४ तासांत पोलिसांनी केली आरोपीस अटक 

या थरारक हत्याकांडामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे हत्याकांड का घडलं ? ते कोणी घडवून आणलं ? तसेच यामुळे नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही भयानक घटना औसा तालुक्यातील वानवाडा रोडवर घडली. ज्या व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं आहे त्याची ओळख पटवण्यात आली आहे. कारमध्ये जळालेल्या नाव गणेश चव्हाण असून औसा तांडा येथील रहिवासी आहे. तो आयसीआयसीआय बँकेचा रिकव्हरी एजंट म्हणून कार्यरत होता. त्याला आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याला एका पोत्यामध्ये बंद केलं आणि कारमध्ये टाकलं. त्यानंतर कारसह त्याला जिवंत जाळण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवण्यात आली, घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे लातूर जिल्हा हादरून गेला आहे.

मृताची ओळख पटवणंही कठीण झालं होत..

ह्या घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कार पूर्णपणे जळालेली असून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत संबंधित व्यक्तीचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. प्रेत इतके जळालं होतं की ओळख पटवणंही कठीण झाल होत. प्रेताची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने पोलिसांनी घटनास्थळावरच पंचनामा करून पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण केली, तसेच नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला. घटनास्थळी सापडलेल्या जळालेल्या कारच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली.

अत्यंत नियोजित आणि क्रूर पद्धतीने हत्या..

सदर कार औसा तांडा येथील असल्याचे निष्पन्न झालं असून नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनधारक व त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. याच अनुषंगाने पोलिसांनी रात्री सुमारे ३.३० वाजता औसा तांडा येथे जाऊन चौकशी सुरू केली. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, यामागे आर्थिक व्यवहार, वसुलीचा वाद की अन्य कोणता गुन्हेगारी कट आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र ही घटना अत्यंत नियोजित आणि क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास औसा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून, या थरारक घटनेच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. या भीषण घटनेमुळे औसा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts