Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • कोल्हापूर – सांगली महामार्गावर भरधाव इनोव्हाची टेम्पोला धडक MCA विद्यार्थिनीचा मृत्यू
गुन्हा

कोल्हापूर – सांगली महामार्गावर भरधाव इनोव्हाची टेम्पोला धडक MCA विद्यार्थिनीचा मृत्यू

Innova car crashes into a tempo on the Kolhapur–Sangli highway; MCA student dies in the accident

MCA student dies in Innova crash : कोल्हापूर येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात भरधाव येणाऱ्या इन्होव्हा काने टेम्पोला धडक दिली असून या अपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर तिची मैत्रीण गंभीर जखमी आहे.

कोल्हापूर-सांगली महामार्गावरील माले फाटा येथे भरधाव इनोव्हा कारने स्क्रॅप व काचेच्या बाटल्या वाहणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील विद्यापीठात MCA प्रथम वर्षात शिकणाऱ्या 22 वर्षीय दिव्या कानिफनाथ भोसले या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिची मैत्रीण देविका भुते गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : कायद्याचा धाक संपला? न्यायालयच्या पार्किंगमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

कसा झाला अपघात

दोघी मैत्रिणी परीक्षा आटोपून देविकाच्या वाढदिवसानिमित्त फिरायला निघाल्या होत्या. कारमधून माले फाट्याजवळ आल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या स्क्रॅप उचलणाऱ्या टेम्पोला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत इनोव्हा हवेत उडून तीन वेळा पलटी झाली. आणि या अपघातात दिव्या भोसले हिचा मृत्यू झाला.

यावेळी नातेवाइकांनी हातकणंगले पोलिसांवर कारवाईत दिरंगाई केल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. काही काळ तणावपूर्ण वातावरण राहिले. अखेर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

मुरुड शहरात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली कारवर पलटी

लातुर जिल्ह्यातील मुरुड शहरातील आंबेडकर चौकात सकाळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉलीचा तोल जावुन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर पल्टी होवून मोठे नुस्कान झाले आहे.मात्र जिवित हाणी टळली. ट्रॅक्टर हवेत चालत असतानाचा व्हिडिओ देखिल समोर येत आहे. या छोट्या मीनी ट्रॅक्टरला मोठे मोठे दोन ट्रॉली लावल्यामुळे हा आपघात झाल्याचे दिसून येत आहे. ट्रॅक्टर वाल्याच्या चुकी मुळे व रस्त्यावर मोठी मोठे खड्डे, मुरुड शहर आतीक्रमणच्या विळख्यात असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts