• Home
  • महाराष्ट्र
  • कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वाहून देणारे जेष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
ताज्या बातम्या

कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वाहून देणारे जेष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

हेल्पलाईन ठरली वरदान 31

Baba Adhav death : मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी आणि कामगारासाठी लढणारे समाजवादी नेते बाबा आढाव यांच निधन झालं आहे. मृत्यू वेळी ते ९५ वर्षाटे होते. मागील काही महिन्यापासून ते काही आजारांनी ग्रासले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती सतत बिघडती त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. दोन दिवासांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांची रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन झालं. त्यावेळी देखील शरद पवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांच्या कार्याचा उजाळा मांडत त्यांना आदरांजली वाहिली होती.

प्रकृतीच्या कारणास्तव मागील १० ते १२ दिवसांपासून बाबा आढाव पुना हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत होते. डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आय.सी.यू मध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारास त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी लढणारा समाजवादी नेता हरवल्याची भावना राज्यभर व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ४ ते ५ या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

बाबा आढाव यांची कारकिर्द

डॉ. बाबा आढाव हे १९७० च्या दशकात पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. त्यावेळी ते मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाचे सदस्य होते. तसेच रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही ते कार्यरत होते. एक गाव एक पाणवठा या मोहिमेत बाबा आढाव यांचा मोठा वाटा होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशी बाबा आढाव यांची ओळख होती, मृत्यू वेळी ते ९५ वर्षाचे होते.

शिवसेना व राष्ट्रवादी फुटीवर परखडपणे भाष्य

एकनाथ शिंदे आणि अजित पवार २०२२ मध्ये बंडखोरी करत पक्षांवर दावा केल्यानंतर, बाबा आढाव यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर परखडपणे मत व्यक्त केलं होतं. माणूस सकाळी कुठं असलं अन् संध्याकाळी कुठ असलं, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, १४० कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं, असं बाबा आढाव म्हणाले होते. पुढे ते म्हणाले होते, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबिय म्हणतायेत की, भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे, असं म्हणत बाबा आढाव यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीवर देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या ९३ व्या वर्षीही आंदोलन केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts