उत्तर प्रदेशातील मैनपुरीतील 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून पळवणाऱ्या दोन आरोपींना चंदनझिरा पोलीसांनी सापळा रचून अटक केली. फैजान आणि आयाज अन्सारी यांना अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी यूपी पोलिसांकडे सोपवण्यात आले. संयुक्त कारवाईत मुलीचा सुखरूप बचाव झाला.












