Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईला नेऊन दारु पाजली, लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलगी रस्त्यावर फेकली!
Top News

मुंबईला नेऊन दारु पाजली, लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलगी रस्त्यावर फेकली!

Mumbai girl assault case

Mumbai girl assault case : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, या कवितेच्या ओळींचा अर्थ आता पहिल्यासारखा लागत नाही, कारण प्रेम म्हणजे केवळ प्रेम राहिलं नसून, अपहरण, मारहाण, दारु, अत्याचार…हे त्यात आलं की प्रेम प्रेम कुठे राहतं? अशाच एका धक्कादायक प्रकरणानं सध्या अमरावती (Amarawati Crime News) हादरली आहे, प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीचे अपहरण केले (Amish to a minor girl) आणि त्यानंतर मुंबईत नेऊन सलग दोन दिवस अमानुष अत्याचार (Inhuman Atrocities) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

होही वाचा – Jalna Crime News: जालना हादरला! बापाने केले दुसऱ्या लग्नाची तयारी…अन् मुलाने पाठवले यमसदनी

दारू पाजत दोन दिवस मुलीवर अमानुष अत्याचार

शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या खोट्या आमिषाने जाळ्यात ओढून, तिचे अपहरण करून तिला थेट मुंबईत नेण्यात आले. तिथे तिला जबरदस्तीने दारू पाजत सलग दोन दिवस तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुखी संसाराचे आमिष दाखवून मुलीला विश्वासात घेतलं

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अमरावती शहरातील रहिवासी असून ती अवघ्या १७ वर्षांची आहे. आरोपी रोहित बनसरे पवार याने गेल्या काही दिवसांपासून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. लग्नाचे आणि सुखी संसाराचे आमिष दाखवून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला. ६ एप्रिलच्या सुमारास आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. घरच्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली होती.

अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस पाशवी अत्याचार

आरोपी रोहितने पीडितेला अमरावतीवरून थेट मुंबईत नेले. तिथे एका निर्जन ठिकाणी किंवा खोलीत तिला डांबून ठेवण्यात आले. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जबरदस्तीने दारू पाजली. नशेत असलेल्या आणि हतबल झालेल्या या अल्पवयीन मुलीवर आरोपीने सलग दोन दिवस पाशवी अत्याचार केले. केवळ अत्याचार करून तो थांबला नाही, तर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाणही केली. दोन दिवस आपल्या वासनेची भूक भागवल्यानंतर आणि मुलीची प्रकृती खालावल्याचे लक्षात आल्यावर, नराधम रोहितने तिला मुंबईतील रस्त्यावर मरणासन्न अवस्थेत सोडून दिले आणि तिथून पळ काढला.

लिसांनी संशयित आरोपी रोहित पवारचा लावला छडा

पीडित मुलगी कशीबशी अमरावतीत परतली, तेव्हा तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सिटी कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रोहित बनसरे पवार याचा छडा लावला आणि त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारीरिक जखमांसोबतच बसलेला मानसिक धक्का

सध्या पीडित मुलीवर अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शारीरिक जखमांसोबतच तिला बसलेला मानसिक धक्का प्रचंड मोठा आहे. सलग झालेला अत्याचार आणि मारहाणीमुळे तिची प्रकृती अद्यापही स्थिर झालेली नाही. डॉक्टरांचे एक पथक तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

नराधमाला भरचौकात फाशी द्या, नागरीकांच्या भावना

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “अशा नराधमांना भरचौकात फाशी दिली पाहिजे,” अशा भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. विविध महिला संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून आरोपीला कठोरतम शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडिया आणि मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुली कशा प्रकारे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकतात, याचे हे जळजळीत उदाहरण आहे. पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांच्या वागण्यावर आणि त्यांच्या मित्रमंडळींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts