• Home
  • देश
  • इराण-अमेरिका शस्त्रसंधी चर्चा वाढणार; नेतान्याहू यांची लेबनॉनसोबतच्या चर्चेला मंजुरी
ताज्या बातम्या

इराण-अमेरिका शस्त्रसंधी चर्चा वाढणार; नेतान्याहू यांची लेबनॉनसोबतच्या चर्चेला मंजुरी

इराण-अमेरिका शस्त्रसंधी चर्चा वाढणार; नेतान्याहू यांची लेबनॉनसोबतच्या चर्चेला मंजुरी

Iran US War : इराण आणि अमेरिकेच्या वाटाघाटीकारांनी शुक्रवारी इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय चर्चेची तयारी सुरु केली, जी शनिवारी सुरु होणार आहे. इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील चकमकी आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या नियंत्रणामुळं ताणलेला शस्त्रसंधी स्थिर करण्याचा दोन्ही बाजू प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स वॉशिंग्टनहून निघणार होते, तर इराणनं आपल्या चमूबाबत मौन बाळगलं आहे. लेबनॉनमधील इस्रायली हल्ले थांबवण्यासाठी इराण वॉशिंग्टनवर दबाव आणत आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लेबनॉनसोबतच्या चर्चेला मंजुरी दिल्यानंतर इराण-अमेरिका शस्त्रसंधी चर्चा पुढं सरकण्यास सुरुवात झाली आहे. इस्रायली संरक्षण दलाचा (IDF) दावा आहे की, हिजबुल्लाहनं इस्रायलकडे शस्त्रसंधीसाठी आवाहन केलं आहे.

 

हेही वाचा : भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचं निधन; टीम इंडियाच्या पहिल्या विजयात होतं

 

आयआरजीसीनं दिली धमकी :

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संबंधित असलेल्या निम-सरकारी तस्निम वृत्तसंस्थेनं दावा केला आहे की, जर असं झालं नाही, तर चर्चा स्थगित केली जाईल. दरम्यान, कुवेतनं म्हटलं आहे की गुरुवारी रात्री त्यांच्यावर ड्रोन हल्ला झाला, ज्यासाठी त्यांनी इराण आणि प्रादेशिक मिलिशियांना जबाबदार धरलं आहे. इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्यूशनरी गार्ड’नं कोणताही हल्ला केल्याचं नाकारलं असलं तरी, त्यांनी यापूर्वी मध्य पूर्वेत असेच अनेक हल्ले केले आहेत, परंतु त्यांची जबाबदारी स्वीकारली नाही. इराणसोबतच्या चर्चेव्यतिरिक्त, पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमधील स्टेट डिपार्टमेंटमध्ये इस्रायल-लेबनॉन चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे, ज्यामुळं मध्य पूर्वेतील युद्धविरामाच्या प्रयत्नांना चालना मिळू शकते. ही माहिती एका अमेरिकी अधिकाऱ्यानं आणि नियोजनाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीनं दिली, ज्यांनी या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळं नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.

लेबनॉनसोबत युद्ध सुरुच ठेवण्याची नेतन्याहू यांची घोषणा :

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी सांगितलं की, त्यांनी लेबनॉनसोबत शक्य तितक्या लवकर थेट चर्चेला मंजुरी दिली आहे. इराण-समर्थित हिजबुल्ला अतिरेक्यांना निःशस्त्र करणं आणि दोन्ही शेजारी देशांमध्ये संबंध प्रस्थापित करणं हा याचा उद्देश आहे. इस्रायल आणि लेबनॉन तांत्रिकदृष्ट्या 1948 पासून युद्धात आहेत. नेतन्याहू यांनी नंतर जोर देऊन सांगितलं की त्यांच्यात कोणताही युद्धविराम नाही. इस्रायलची ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा युद्धविराम करारामध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील लढाई थांबवण्याचा समावेश आहे की नाही हे अस्पष्ट होते. एक दिवस आधी, इस्रायलनं बेरुतवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यामुळं 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरु झाल्यापासून लेबनॉनमधील तो सर्वात प्राणघातक दिवस ठरला.

इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद :

वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या या चर्चेचं नेतृत्व अमेरिकेच्या बाजूनं लेबनॉनमधील अमेरिकेचे राजदूत मिशेल इस्सा आणि इस्रायलच्या बाजूनं अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत येचिएल लाइटर करतील. शुक्रवार सकाळपर्यंत लेबनॉन सरकारकडून कोणताही प्रतिसाद आला नव्हता आणि लेबनॉनचं प्रतिनिधित्व कोण करेल हे अस्पष्ट होतं. या चर्चेची वेळ आणि ठिकाण सर्वप्रथम ‘ॲक्सिऑस’नं (Axios) कळवलं. युद्धविरामाच्या घोषणेसह विजयाचा दावा केल्यानंतर, दोन्ही देश एकमेकांवर दबाव आणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts