Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यात 8 कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
Pune

पुण्यात 8 कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

Anti-Corruption Bureau officers in Pune detaining two suspects in an ₹8 crore bribe case

Pune 8 crore bribe case : पुण्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. या विभागाने तब्बल 8 कोटींची लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पुण्यात 8 कोटी रुपयांची लाच घेताना दोघांना अटक करण्यात आली असून विश्वमनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनोद देशमुख आणि भास्कर पौळ अशी या आरोपींची नावे असून दोघांनी समोरील व्यक्तीला एकूण आठ कोटींची लाच मागितली होती. त्यापैकी 30, लाख रुपये घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील कँटॉन्टमेन्ट क्षेत्रात तक्रारदार यांची 32 गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या 7/12 किंवा अन्य बाबींचे काम पूर्ण करण्यासाठी धडपड करत होते. परंतु त्यानंतर 2020 या वर्षी तक्रारदारांचे कामे पूर्ण करण्यात आले नाही. हे कामे पूर्ण करायचे असल्याचे सरकारी अभिलेख विभागातील काही अधिकारी व मध्यस्थांमार्फत लाच द्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यावेळी विनोद देशमुख आणि भास्कर पौळ या दोन्ही आरोपींनि तक्रारदारांना 8 कोटी रुपयांची मागणी केली. 8 कोटी रुपये जाम केल्यानंतरच तुम्हाला कागदपत्रे मिळतील अशी अट घातली. त्यानंतर तक्रारदारांना मानसिक त्रास देण्यात आला. या छळाला कंटाळून तक्रारदार यांनी 5 डिसेंबर रोजी ACB कडे तक्रार दिली.

हे ही वाचा :रोहा तालुक्यात घरफोडी आणि दुचाकी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

30 लाख घेताना रंगेहाथ पकडले

ACB कडे तक्रार दाखल झाल्यापासून त्यांनी संपूर्ण घटनेचा तपस करून सत्यता पडताळून पहिली. त्यानंतर सापळा रचला. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी 30 लाख रुपये देण्यास सांगितले. आणि याचवेळी ACB टीमने दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. आता दोन्ही आरोपींवर  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत लाच मागणे, लाच स्वीकारणे, या संपूर्ण प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts