Rohit Arya A Wednesday attack plot : मुंबई येथील पवई भागात आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्या नामक व्यक्तीने 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या आरोपी रोहित आर्याने इमारतीला आग लावून देण्याचे भाष्य केले होते. आता या प्रकरणांमध्ये मोठा खुलासा झाल्याचे बघायला मिळत आहे.
आरोपी रोहित आर्या हा कट तीन महिन्यापासून आखत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याने A Wednesday या चित्रपटातील काल्पनिक कथा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केल्याचे देखील उघड झाले आहे. त्याने ऑडिशनसाठी बाल कलाकार हवेत अशी जाहिरात दिली होती. त्यानंतर त्याने पवईतील आर के स्टुडिओ काही दिवसांसाठी बुक केला. ही जाहिरात पाहिल्यानंतर राज्यातील प्रत्येक कोपऱ्यातून 70 मुले ऑडिशनसाठी आली होती. त्यातील 17 मुलांची त्याने निवड केली. आणि त्यानंतर मुलांचे तीन ग्रुप बनवले. आणि प्रत्येकाला भासून दिले की इथे खरच चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. यामुळे कोणत्याही पालकांनी आक्षेप घेतला नाही.
रोहित आर्या हा पोलिसांना घाबरवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या चार मुलांना पेटवण्याच्या देखील तयारीत होता. त्याने त्यासाठी साहित्य देखील सोबत ठेवले होते. याबाबत त्याने व्हिडिओ देखील शेअर करायला होता. या व्हिडिओमध्ये त्याने बरेच लोक आपल्या सोबत असल्याचा देखील दावा केला. आर्या सोबत असलेली ही काही लोक कोण आहेत याचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सध्या पोलिसांनी सतर्कता दाखवत मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कार्य सुरू असून मुलांचे मेडिकल चेकअप करून त्यांना चौकशी झाल्यानंतर सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवण्यात येत आहे. रोहित आर्याने हे सर्व का केले असा प्रश्न आता उपस्थित राहतो ? याचे कारण होते की शिक्षण विभागाने आपले दोन कोटी रुपये दिले नसल्याचे त्याने सांगितलं. यावर शिक्षण विभागाने हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले.
रोहित आर्या हा मारला गेला असला तरीही त्याच्यासोबत असलेले इतर व्यक्ती हे अजूनही बाहेर फिरत आहे. त्यामुळे त्यांना पकडणे हे पोलीस प्रशासनाला आव्हानात्मक आहे. (Rohit Arya A Wednesday attack plot)










